जालना : अंकुशनगर येथील कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखाना, युनिट क्रमांक एकने यंदाच्या गळीत हंगामात ऊसतोडणीच्या कार्यक्रम नियोजनबद्ध पद्धतीने केले आहे. शेतकऱ्यांनी घाईगडबड न करता कारखाना प्रशासनाला सहकार्य करावे. कारखाना कार्यक्षेत्रातील १०० टक्के ऊस गाळप होईपर्यंत कारखाना बंद केला जाणार नाही, असे प्रतिपादन माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले. कारखान्याच्या २०२६-२७ या ४३ व्या गळीत हंगामाचा प्रारंभ बुधवारी ऊस उत्पादक शेतकरी, ऊसतोडणी मजूर, वाहतूकदार, कर्मचारी व कामगारांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
या कार्यक्रमात गव्हाणीत उसाची मोळी टाकून शेतकरीहिताचा संकल्प करण्यात आला. गळीत हंगामप्रारंभ प्रसंगी बोलताना राजेश टोपे म्हणाले, की यंदा जायकवाडीत समाधानकारक पाणीसाठा असल्याने शेतीसाठी पाणी सोडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. कारखान्याच्या यशस्वी वाटचालीत सभासद, ऊस उत्पादक शेतकरी, ऊसतोडणी व वाहतूक कंत्राटदार, मजूर, अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मोठे योगदान आहे. सहकारी साखर कारखाना हे शेतकऱ्यांचे मंदिर असून, राजकारण व स्वार्थ बाजूला ठेवून सर्वांनी काम करणे गरजेचे आहे. दुष्काळामुळे चारा, पाणी व ग्रामीण रोजगाराचा प्रश्न गंभीर होत असल्याने चारा छावण्या, पाण्याचे टँकर आणि रोजगारासाठी पाठपुरावा करण्याची गरजही टोपे यांनी व्यक्त केली.



















माझ्या कडे शेतकरी, त्यांच्या जमिनीवर काम म्हणजे एक द्रावण आहे.
100% रिझल्ट मिळाला आहे गेले दोन वर्षे झाली आहेत.
द्रावण शेड्युल व प्रमाण पाण्या बरोबर व्यवस्थित आपल्या शेतात ड्रीप द्वारे सोडले तर चांगले रिझल्ट आले आहेत.
आपली शेतात माथी भुसभुशीत व माऊ आणि गांडूळ तयार होतात.
हे द्रावण पूर्णपणे ऑरगॅनिक आहे त्यामुळे जमिनी ची पोत वाढते, शिवाय जे पीक लावले आहे ते पण चांगले येते.
आपल्या शेतकरी त्यांच्या जमिनीवर काम करायचे असेल तर जरूर संपर्क साधा आम्हीं तुमच्या शेतात येऊन आपणास कसा करायचं आहे ते तुम्हाला गाईडन्स करू शकतो.
कृपया संपर्क करावा .
विनोद भागवत.
इंजिनियर्स आणि कन्सल्टंट. / इंडस्ट्रियलिस.
पुणे/ नाशिक.
9762237169/९७६२२३७१६९.