कोल्हापूर : ‘अन्नपूर्णा शुगर’चा शेतकरी आंदोलनाला पाठिंबा, ऊस तोडणी बंद ठेवण्याचा निर्धार

कोल्हापूर : अन्नपूर्णा शुगरने स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह विविध शेतकरी संघटनांनी सुरू केलेल्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला आहे. केनवडे येथील अन्नपूर्णा शुगरच्या कार्यस्थळावर आयोजित पत्रकार परिषदेत संस्थापक व माजी आमदार संजय घाटगे यांनी आंदोलनाच्या समर्थनार्थ कारखान्याची ऊसतोड बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतल्याची माहिती दिली. यावेळी कारखान्याने कार्यकारी संचालक अंबरिष घाटगे उपस्थित होते. अन्नपूर्णा शुगरच्या वाटचालीत शेतकऱ्यांचे मोठे योगदान आहे. शेतकऱ्यांनी आजवर दिलेले सहकार्य आम्ही विसरू शकत नाही. यापुढेही असेच सहकार्य आणि विश्वास कायम राहावा, असे आवाहन घाटगे यांनी केले.

संजय घाटगे म्हणाले की, सध्याचे साखरेचे व इथेनॉलचे दर पाहता शेतकरी संघटनेने मागणी केलेला दर देणे कारखानदारांना परवडणारे नाही. त्यामुळे माजी खासदार राजू शेट्टी यांनी मागणी केल्याप्रमाणे साखरेला व इथेनॉल किमान आधारभूत किंमत मिळाली तरच कारखानदार व शेतकरी हिताचे होईल. यासाठी या आंदोलनाला आमचा पाठिंबा राहील. कष्टकरी शेतकऱ्यांच्या उसाला योग्य आणि न्याय दर मिळावा, अशी आमचीही अपेक्षा आहे. यावेळी पत्रकार परिषदेस संचालक दिनकर पाटील, दत्तोपंत वालावलकर, एम. बी. पाटील, मल्हारी पाटील, के. के. पाटील, तानाजी पाटील, विश्वास दिंडोर्ले आदी उपस्थित होते.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here