अहिल्यानगर : अशोक सहकारी साखर कारखान्यांचे सर्वेसर्वा माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी येथील सेवा संस्थेच्या प्रांगणात ऊस उत्पादकांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रगतशील शेतकरी बाबासाहेब बनकर होते. गळीत हंगाम सुरु झाल्याने कारखान्याबाबत वेगवेगळ्या व वावड्या उठत असल्याने माजी आ. मुरकुटे यांनी कार्यक्षेत्रात सभासदांच्या बैठका घेऊन अशोकची बाजू भक्कमपणे मांडली. अशोक कारखाना ही तालुक्याची कामधेनू आहे. कारखान्याने भेंडा व सोनईच्या बरोबरीने अशोकने नेहमीच दर दिलेला आहे. मात्र हा कारखाना बंद पाडण्याचा दलालांचा डाव आहे. त्यामुळे ऊस ऊत्पादक सभासदांनी आपल्या कारखान्यालाच ऊस पुरवठा करुन कामधेनू वाचविली पाहिजे. कारखाना बंद पाडण्याचा डाव उधळून लावा, असे आवाहन माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी यावेळी केले.
संचालक शिवाजी शिंदे, माजी उपसरपंच राजेंद्र कोकणे, भारत भवार, प्राचार्य जयकर मगर यांनी मनोगत व्यक्त करुन काही सूचना मांडल्या. राष्ट्रवादी काँग्रेस किसान सभेचे उत्तर जिल्हाध्यक्ष राजेंद्र कोकणे म्हणाले, राजकारणात मुरकुटे यांचा राजकीय विरोधक असलो तरी ऊस उत्पादकांनी मात्र अशोकलाच ऊस द्यावा हे तत्त्व मी पाळतो. कारखाना टिकला पाहिजे. यावेळी लहानभाऊ नाईक, माजी चेअरमन ज्ञानदेव साळुंके, भारत भवार, शिवाजी शिंदे, राजेंद्र कोकणे, मयुर पटारे, दत्तात्रय नाईक, नानासाहेब लेलकर, गणेश छल्लारे, संचालक निरज मुरकुटे, मधुकर कोकणे, बापूराव त्रिभुवन, दादासाहेब कोकणे, विलास दाभाडे, जयकर मगर, गजानन कोकणे, लहानभाऊ पवार, रावसाहेब वाघुले, सुनील बोडखे, रामकृष्ण गायकवाड, बापूसाहेब शिंदे, रंगनाथ पवार, रामनाथ पटारे, तुकाराम बोडखे, मच्छिद्र कोकणे, पाराजी पटारे, रेवननाथ कोकणे, बाळासाहेब खुरुद, प्रकाश नाईक, सुभाष पटारे, सुभाष येवले उपस्थित होते.



















sarkar ne sarva TABYAT GYAVE SHEREHOLDER Tapasave