सोलापूर : ऊस वाहतुकीच्या ट्रॅक्टरचे पूजन करून सहकार महर्षी कारखान्याचे गाळप सुरू

सोलापूर : अकलूज येथील सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाला सुरुवात झाली आहे. या नव्या गळीत हंगामात कोळेगाव येथून ऊस भरून येणाऱ्या पहिल्या पाच ट्रॅक्टरचे पूजन अकलूज नगरपरिषदेचे नगरसेवक सयाजीराजे मोहिते-पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. चालू हंगामात अधिकाधिक ऊस आपल्या कारखान्यामध्ये गाळपासाठी आणण्याचा प्रयत्न वाहतूकदारांनी करावा असे आवाहन कारखाना प्रसासनाच्यावतीने करण्यात आले.

या कार्यक्रमात कारखान्याशी संलग्न शिवसृष्टी मल्टिमीडिया लेझर शोचे संचालक धनंजय (भाऊ) दुपडे, अकलूज कृषी उत्पन्न बाजार समिती, अकलूजचे संचालक नितीन सावंत, रत्नप्रभादेवी बीज उत्पादक संघाचे माजी संचालक सचिन सावंत यांच्यासह ज्ञानेश्वर सावंत, नागनाथ दपडे, गणेश निंबाळकर, विजय पडे, प्रसाद दुपडे, केशव सावंत, अनिल सावंत, सुभाष सावंत यांच्यासह ऊस वाहतूकदार, तोडणी कर्मचारी, सभासद शेतकरी उपस्थित होते.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here