कोल्हापूर : श्री छत्रपती राजाराम साखर कारखान्याचा गळीत हंगामास प्रारंभ, प्रतिदिन ५ हजार मे.टन ऊस गाळपाचे नियोजन

कोल्हापूर : येथील श्री छत्रपती राजाराम साखर कारखान्याचा सन २०२६-२७ चा गळीत हंगाम प्रारंभ सोमवार, दि. १२ रोजी मार्गदर्शक संचालक माजी आ. महादेवराव महाडिक यांच्या हस्ते करण्यात झाला. कारखान्याने यंदाच्या हंगामात प्रतिदिन ५ हजार मे.टन ऊस गाळप करण्याच्या दृष्टीने तोडणी व वाहतूक यंत्रणा सज्ज केली असून, सभासद शेतकऱ्यांचा ऊस वेळेत गाळपासाठी आणण्याचे नियोजन केले आहे.

चेअरमन, आ. अमल महाडिक म्हणाले, कारखान्याचा १८.५ मेगावॅट क्षमतेचा सहवीज निर्मिती प्रकल्प व मशिनरी आधुनिकीकरणाचे काम पूर्ण झाले असून, हे प्रकल्प यंदाच्या गळीत हंगामापासून कार्यान्वित होणार आहेत. यामुळे कारखान्याची कार्यक्षमता व उत्पादन वाढण्यास मदत होणार आहे.यावेळी व्हा. चेअरमन गोविंदा चौगले, संचालक मंडळाचे सदस्य, कार्यकारी संचालक प्रकाश चिटणीस, वसंतदादा ऊस तोडणी वाहतूक संस्थेचे पदाधिकारी, श्री छत्रपती राजाराम पतसंस्था, श्री छत्रपती राजाराम कारखाना नोकर सहकारी सोसायटीचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here