लातूर : जागृती शुगरकडून ३००० रुपये पहिल्या हप्त्याची संस्थापक, अध्यक्ष दिलीपराव देशमुख यांची घोषणा

लातूर : तळेगाव येथील जागृती शुगर अॅण्ड अलाइड इंडस्ट्रीजचा १५ वा गळीत हंगाम प्रारंभ नुकताच झाला. मांजरा साखर परिवाराच्या माध्यमातून अतिशय पारदर्शक कारभार करत शेतकऱ्यांना अधिक मदत करण्याची भूमिका सातत्याने घेण्यात आली आहे. सहकार क्षेत्रात लोकांनी योग्य विचारांच्या माणसांच्या पाठीमागे उभे राहावे, असे आवाहन जागृती शुगर्सचे संस्थापक अध्यक्ष व माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी केले. सध्याच्या दुष्काळाच्या काळात मांजरा साखर परिवाराच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पदरात जास्तीत जास्त दर देण्याचा प्रयत्न सुरू आहे. यातूनच जागृती शुगर्सच्या वतीने चालू हंगामात उसाला पहिला हप्ता ३,००० रुपये दिला जाणार आहे, अशी घोषणा देशमुख यांनी केली.

दिलीपराव देशमुख यांनी यापूर्वी या परिवारावर लाखो शेतकऱ्यांनी विश्वास ठेवत ऊस गाळपाला दिला. पुढेही द्यावा असे आवाहन केले. कारखान्यातर्फे दर दहा दिवसाला याचे पेमेंट दिले जाणार आहे. गतवर्षी दिलेल्या भावापेक्षा १०० रुपये अधिक दर देण्याची घोषणा देशमुख यांनी केली. कारखान्याचे उपाध्यक्ष लक्ष्मणराव मोरे यांनी मागच्या १४ वर्षाच्या साखर कारखान्याचा प्रगतीचा आढावा घेतला. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला ऊस कारखान्याला द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

ChiniMandi WhatsApp Channel

जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष विजयकुमार पाटील, डॉ. अरविंद भातांब्रे, कल्याण पाटील, गजानन भोपणीकर, दिलीप पाटील नागराळकर यांची भाषणे झाली. राज्य साखर महासंघाचे संचालक आबासाहेब पाटील, मांजरा कारखान्याचे उपाध्यक्ष अशोक काळे, रेणा कारखान्याचे अध्यक्ष अनंतराव देशमुख, उपाध्यक्ष अॅड. प्रवीण पाटील, मारुती महाराज कारखान्याचे अध्यक्ष श्याम भोसले, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अॅड. प्रमोद जाधव, जागृती कारखान्याचे जनरल मॅनेजर गणेश येवले आदींसह अधिकारी, शेतकरी उपस्थित होते.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here