सातारा : श्रीराम कारखान्यात बॉयलर अग्निप्रदीपन, गव्हाण व मोळी पूजनाने गाळप हंगाम सुरू

सातारा : श्रीराम सहकारी साखर कारखाना लि., फलटणच्या ७० व्या गाळप हंगामाचा प्रारंभ, बॉयलर प्रदीपन, तसेच गव्हाण व उसाच्या मोळी पूजन आमदार रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या हस्ते झाले. शेतकरी आणि कामगारांनी योग्य सहकार्य केल्यामुळे संकटात सापडलेला श्रीराम कारखाना पुन्हा सुरू झाला, या यशाचे संपूर्ण श्रेय शेतकरी व कामगारांनाच द्यावे लागेल. कारखाना सुरू राहिला पाहिजे, ही ऊस उत्पादक शेतकऱ्यांसह सर्वांची अपेक्षा आहे. सत्ता कोणाचीही असो किंवा कोणतेही पॅनेल निवडून येवो, सत्तेत येणाऱ्यांनी राजकारण बाजूला ठेवून कारखाना चालवला पाहिजे, असे आवाहन रामराजे नाईक-निंबाळक यांनी केले.

कारखान्याचे संचालक संजीवराजे नाईक-निंबाळकर म्हणाले की, कारखाना आगामी काळात ऊस उत्पादक सभासद शेतकरी व कामगारांच्या सहकार्याने चालविण्याचा संचालक मंडळाचा प्रयत्न आहे. शेतकऱ्यांनी आपला संपूर्ण ऊस गाळपासाठी श्रीराम कारखान्यालाच द्यावा. कार्यक्रमाला अध्यक्ष डॉ. बाळासाहेब शेंडे, उपाध्यक्ष नितीन भोसले, श्रीराम बाजारचे अध्यक्ष जितेंद्र पवार, फलटण दूध संघाचे अध्यक्ष धनंजय पवार, पंचायत समितीचे माजी सभापती शंकरराव माडकर, रेश्मा भोसले, भोजराज नाईक निंबाळकर यांच्यासह ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते. संचालक संतोष खटके यांनी प्रास्ताविक केले. अध्यक्ष डॉ. बाळासाहेब शेंडे यांनी कारखान्याच्या आतापर्यंतच्या कामकाजाचा आढावा घेतला.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here