ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर उद्योगाशी संबंधित प्रश्नांचा अभ्यास करण्यासाठी केंद्र सरकारकडून समिती स्थापन

नवी दिल्ली : भारत सरकारने ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांचा अभ्यास करून त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी नीती आयोगाचे माजी सदस्य प्रा. रमेश चंद यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. कर्नाटक आणि महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींनी केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री तसेच केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्री यांच्यासोबत घेतलेल्या बैठकीत झालेल्या निर्णयांच्या अनुषंगाने या समितीची स्थापना करण्यात आली आहे.

उसाची एफआरपी आणि साखरेच्या एमएसपीचा आढावा

ChiniMandi WhatsApp Channel

ऊस लागवडीचा खर्च आणि इतर संबंधित घटकांचा विचार करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळणाऱ्या रास्त मोबदल्यात वाढ करण्याच्या मागणीचा समिती अभ्यास करणार आहे. तसेच, साखर उत्पादनाचा खर्च, बाजारातून मिळणारे उत्पन्न आणि साखर कारखान्यांची आर्थिक व्यवहार्यता लक्षात घेऊन कारखानास्तरावरील साखरेच्या किमान विक्री किमतीत (Ex-mill– MSP) सुधारणा करण्याच्या मागणीचाही समिती आढावा घेणार आहे.

साखर उतारा तपासणी आणि वजनमापन प्रक्रियेतील पारदर्शकतेवर भर

साखर उताऱ्याची तपासणी व अहवाल सादर करण्यासाठी सध्या अस्तित्वात असलेल्या पद्धती, उताऱ्याची पारदर्शक पडताळणी सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक उपाययोजना आणि साखर कारखान्यांमधील ऊस वजनमापनाच्या प्रचलित पद्धतींचा समिती अभ्यास करणार आहे. यामध्ये वजनकाट्यांचे अचूक कॅलिब्रेशन, तपासणी आणि पडताळणी यंत्रणा पुरेशा सक्षम आहेत की नाही, याचाही समावेश असेल.

यांत्रिक पद्धतीने तोडलेल्या उसाच्या वजनातील कपातीचा अभ्यास

यांत्रिक पद्धतीने ऊसतोडणी केल्यानंतर उसाच्या वजनातून कपात करण्यासंदर्भातील सध्याच्या पद्धतींची समिती तपासणी करणार आहे. यांत्रिक ऊसतोडणीमुळे प्रत्यक्षात काही वजनघट किंवा नुकसान होत असल्यास त्याचे प्रमाणही निश्चित केले जाणार आहे.सध्या अवलंबल्या जाणाऱ्या पद्धतींचा शेतकऱ्यांना देय असलेल्या ऊसदरावर होणारा आर्थिक परिणाम समिती तपासणार आहे. याशिवाय, आवश्यक वाटल्यास या विषयाशी संबंधित इतर बाबींचाही विचार केला जाऊ शकतो.

सर्व संबंधित घटकांशी चर्चा करून अहवाल सादर करणार

समिती शेतकरी प्रतिनिधी, साखर कारखाना संघटना, राज्य सरकारे तसेच आवश्यकतेनुसार इतर तज्ज्ञ आणि संस्थांशी चर्चा करणार आहे.समिती आपले निष्कर्ष आणि ठोस शिफारशी असलेला अहवाल शक्य तितक्या लवकर सक्षम प्राधिकरणाच्या विचारार्थ सादर करणार आहे.

प्रा. रमेश चंद यांचा कृषी क्षेत्रातील व्यापक अनुभव

समितीचे अध्यक्ष प्रा. रमेश चंद हे प्रख्यात कृषी अर्थतज्ज्ञ आणि सार्वजनिक धोरण क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत. त्यांनी २०१५ ते २०२६ या कालावधीत नीती आयोगाचे सदस्य म्हणून काम केले आहे. यापूर्वी त्यांनी भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या राष्ट्रीय कृषी अर्थशास्त्र व धोरण संशोधन संस्थेचे (ICAR-NIAP) संचालक आणि पंधराव्या वित्त आयोगाचे सदस्य म्हणूनही काम पाहिले आहे.कृषी विकास, शेतकऱ्यांचे प्रश्न, अन्नसुरक्षा, कृषी बाजारपेठा आणि कृषीमालाच्या किमतींचे धोरण या क्षेत्रांत त्यांना व्यापक अनुभव आहे.

समितीतील इतर सदस्य….

या समितीमध्ये पुढील अधिकाऱ्यांचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे:

कृषी आयुक्त, कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय

सहसचिव (साखर), अन्न व सार्वजनिक वितरण विभाग

सहसचिव (कायदेशीर मापनशास्त्र), ग्राहक व्यवहार विभाग

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here