कोल्हापूर : ओलम शुगरचे विस्तारीकरण पूर्ण, आठ लाख टन ऊस गाळप करणार

कोल्हापूर : राजगोळी खुर्द (ता. चंदगड) येथील ओलम साखर कारखान्याच्या १७ व्या गळीत हंगामाच्या प्रारंभ, मोळी पूजन कार्यक्रम नुकताच उत्साहात झाला. ओलम (हेमरस) कारखान्याने गाळपासाठी येणाऱ्या उसाचा विचार करून कारखान्याच्या विस्तारीकरणाचे काम पूर्ण केले आहे. कारखान्याची गाळप क्षमता वाढवली आहे. त्यामुळे आठ लाख टन उसाच्या गाळपाचे उद्दिष्ट निश्चित केल्याची माहिती कारखान्याचे बिझनेस हेड टी. कन्नन यांनी दिली. कारखान्याकडून उसाला चांगला दर दिला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कारखान्याचे शेती अधिकारी पाटील यांनी प्रास्ताविकात कारखान्याच्या विविध योजनांची माहिती दिली व शेतकरी केंद्रबिंदू ठेवून कारखान्याची वाटचाल सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. कारखान्याची गाळप क्षमता वाढवली असल्याने उसाची उचल लवकर होणार आहे. शेतकऱ्यांनी ऊस तोडण्याची घाई करू नये असे आवाहन त्यांनी केले. यावेळी युनिट हेड एस. राधाकृष्णन, शेती अधिकारी सुधीर पाटील, व्यवस्थापक सचिन पाटील, सहायक व्यवस्थापक श्रीशैल हलागुनाकी, अनिल पाटील, नरेंद्र रावत, संतोष गुरव, पी. रवी, भागोजी लांडे, आप्पा सुरूतकर, दुगैशी तोमर उपस्थित होते. सतीश कागणकर यांनी सूत्रसंचालन केले. नामदेव पाटील यांनी आभार मानले.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here