कर्नाटक : केंपवाड येथे अथणी शुगर्सच्या गळीत हंगामास प्रारंभ

रगुप्पी : सध्याच्या काळात जीवनावश्यक वस्तूंच्या किमती तीन पटीने वाढल्या आहेत. त्या तुलनेत शेतकऱ्यांच्या उत्पन्नात अपेक्षित वाढ झालेली नाही. शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती चिंताजनक बनली आहे. शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य लाभावे व त्यांना सन्मानाने जीवन जगता यावे, यासाठी सरकारने उसाचा योग्य दर निश्चित करणे गरजेचे आहे, असे मत माजी मंत्री तथा अथणी शुगर्सचे अध्यक्ष श्रीमंत पाटील यांनी व्यक्त केले. केंपवाड येथील अथणी शुगर्स साखर कारखान्याच्या गळीत हंगामाच्या प्रारंभप्रसंगी ते बोलत होते.

श्रीमंत पाटील म्हणाले, साखर उद्योगाचे अस्तित्व टिकवून त्याचा भविष्यातील विकास साधायचा असल्यास केंद्र सरकारने साखरेचा किमान विक्री दर (एमएसपी) व इथेनॉलचा खरेदी दर वाढविणे आवश्यक आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्या योग्य आहेत. व्यवस्थापकीय संचालक श्रीनिवास पाटील, संचालक उत्तम पाटील, अब्दुलबारी मुल्ला, अप्पासाब अवताडे, शेती अधिकारी बंडू जगताप, सुधाकर भगत, शंकर शेमडे, चंद्रकांत पाटील, संजय सावंत, रमेश आजूर, मारुती खोत, संभाजी सावंत, इंद्रजित पाटील, सुनील पाटील, शरद जतकर, मंजुनाथ हल्लोळी, महांतेश कांबळे आदींसह पदाधिकारी, शेतकरी उपस्थित होते.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here