सातारा : साखरवाडी (ता. फलटण) येथे श्रीदत्त इंडिया कारखान्याच्या आठव्या गाळप हंगामाचा मोळी पूजन कार्यक्रम आमदार रामराजे नाईक निंबाळकर, श्रीकृष्ण देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष महंत विद्वांसबाबा शास्त्री, श्रीदत्त इंडियाच्या अध्यक्ष प्रीती रुपारेल, संचालक जितेंद्र धारू यांच्या हस्ते, तसेच कंपनीचे संचालक चेतन धारू, परीक्षित रुपारेल, करन रुपारेल यांच्या उपस्थितीत झाला. हंगामात उच्चांकी गाळपाचे उद्दिष्ट ठेवले असून, यासाठी लागणाऱ्या तोडणी व वाहतूक यंत्रणेची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. एनसीएलटीच्या माध्यमातून सात वर्षांपूर्वी घेतलेल्या कारखान्याच्या विस्तारवाढीचे काम पूर्ण झाले आहे.
पूर्वी ३५०० मेट्रिक टन गाळप क्षमता असलेला कारखाना यावर्षी विस्तारवाढीनंतर पूर्ण क्षमतेने उसाचे गाळप करेल, असे कारखान्याचे प्रशासकीय अधिकारी श्री. जगताप यांनी सांगितले. या वेळी माजी सभापती शंकरराव माडकर, श्रीराम कारखानाचे उपाध्यक्ष नितीन भोसले, उपाध्यक्ष भारत तावरे, चांगदेव साळवी, अमोद पाल, सदानंद पाटील, दिगंबर माने, रमेश बागणवर, एचआर संजय भुसनार, नितीन नाईकनवरे, अजित कदम, किशोर फडतरे, नितीन रणवरे, विशाल साखरे, नितीन होले, कामगार युनियनचे राजेंद्र भोसले, पोपट भोसले, एस. के. भोसले, नितीन भोसले, मच्छिंद्र भोसले, अजय कदम, सुरेश भोसले, संजय जाधव, संजय भोसले, जयराम भोसले, सुरेश भोसले, कारखान्याचे अधिकारी, कामगार व शेतकरी उपस्थित होते.


















