सोलापूर : ऊस दर आंदोलनाची वाहतुकदारांना धास्ती, वाहतूक करण्यास नकार

सोलापूर : मंगळवेढा तालुक्यात भीमा नदी पट्टयात ऊस दराच्या आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह इतर विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी ऊस वाहतूक करणारी वाहने थांबवून चालकांकडून दर जाहीर होईपर्यंत वाहतूक न करण्याबाबत शब्द घेतला आहे. यापुढे वाहने आढळल्यास कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशाराही देण्यात आला. त्यामुळे अनेक चालकांनी दराचा तिढा सुटेपर्यंत वाहतूक नसल्याचे करणार सांगितले. काही वाहनमालकांनीही याबाबत कारखानदारांना कळविले आहे. अनेक चालकांनी दराचा तिढा सुटेपर्यंत वाहतूक करणार नसल्याचे सांगितले. त्यामुळे ऊस वाहतुकीला ब्रेक लागला आहे. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी वाहनचालकांना दर जाहीर होईपर्यंत ऊस वाहतूक करू नये, असे आवाहन केले आहे.

भीमा नदीकाठच्या अनेक गावांतील शेतकरी स्वतःहून ऊसदर जाहीर होईपर्यंत तोड करू नये, असे कारखान्यांच्या चिटबॉयना सांगत आहेत. सध्या उसाची टंचाई जाणवत असून, दक्षिण भागातील पशुपालकांकडून चाऱ्यासाठी उसाची मागणी वाढली आहे. याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवराज घुले यांनी सांगितले की, उसाला योग्य दर मिळेपर्यंत वाहनचालक व मालकांनी शेतकऱ्यांना सहकार्य करावे. शेतकऱ्यांची एकजूट कायम राहिली, तरच उसाला न्याय्य दर मिळेल. हा लढा शेतकऱ्यांच्या हक्काचा असून, सर्वांनी एकत्र येऊन साथ द्यावी. तर शेतकऱ्यांच्या उसाचा दर निश्चित होईपर्यंत त्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन स्वाभिमानीचे अनिल बिराजदार यांनी केले.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here