पुणे : छत्रपती कारखान्याचे एका दिवसात ९२४५ टन उसाचे विक्रमी गाळप, हंगामाला गती

पुणे : भवानीनगर येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या ऊस गळीत हंगामास ११ ऑक्टोबरपासून सुरुवात झाली आहे. कारखान्याने पहिल्या दिवसापासून गाळपात आघाडी घेतली असून एका दिवसात नऊ हजार २४५ टन उसाचे विक्रमी गाळप केल्याची माहिती छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक, उपाध्यक्ष शिवाजी निंबाळकर व संचालक मंडळाने दिली. कारखान्याचे संचालक मंडळ, सभासद, गेटकेनचे शेतकरी, कारखान्यातील अधिकारी, कर्मचारी यांच्या सहकार्यामुळे उस गाळपामध्ये कारखान्याने आघाडी घेतली आहे. कारखान्याने यापूर्वी ३१ डिसेंबर २०२५ रोजी ८ हजार ५४३ टन गाळप विक्रमी गाळप झाले होते. तो विक्रम मोडून काढत एका दिवसात ९,२४५ टन ऊस गाळप करण्यात यश आले आल्याचे त्यांनी सांगितले.

अध्यक्ष जाचक व उपाध्यक्ष निंबाळकर यांनी सांगितले की, चालू हंगामात कारखान्याने १३ दिवसांत ८९ हजार १०२ टन उसाचे गाळप केले असून, ७३ हजार ६०० क्विंटल साखरेची निर्मिती केली आहे. शुक्रवारी (ता. २३) साखरेची रिकव्हरी (उतारा) १०.२९ टक्के मिळाला असून, सरासरी रिकव्हरी ८.७५ टक्के झाली. सहवीज निर्मिती प्रकल्पातून ३२ लाख ५० हजार युनिटची निर्मिती केली असून यातील १९ लाख ४५ हजार युनिट वीज महावितरणला निर्यात केली आहे. कारखान्याच्या युनिट नंबर-१ची गाळप क्षमता ३००० टन व युनिट नंबर-२ची गाळप क्षमता ३५०० टन प्रतिदिन आहे. दोन्ही युनिटच्या माध्यमातून ६५०० टन ऊस गाळप होतो. आता कारखाना क्षमतेपेक्षा अधिक गाळप करीत आहे. दोन्ही युनिटच्या माध्यमातून शुक्रवारी (ता. २३) दहा वर्षांतील उच्चांकी ९,२४५ टन उसाचे गाळप झाल्याचे कारखान्याच्या संचालक मंडळाने सांगितले.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here