रेणुकादेवी कारखान्याकडून ऊस उत्पादकांना दिवाळीची भेट; उर्वरित १०० रुपये दिवाळीपूर्वी खात्यावर जमा होणार

छत्रपती संभाजीनगर : पैठण तालुक्यातील रेणुकादेवी शरद सहकारी साखर कारखान्याने सन २०२५-२६ च्या गळीत हंगामासाठी जाहीर केलेल्या प्रतिटन २,८०० रुपये ऊसदरापैकी उर्वरित १०० रुपये दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहेत. यापूर्वी शेतकऱ्यांना प्रतिटन २,७०० रुपये अदा करण्यात आले आहेत. कारखान्याचे चेअरमन तथा आमदार विलास भुमरे यांनी ही माहिती दिली. तसेच, आगामी २०२६-२७ गळीत हंगामासाठी कारखान्याने प्रतिटन २,९०० रुपये ऊसदर जाहीर केला आहे.

पैठण येथे शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत भुमरे यांनी सांगितले की, स्थानिक ऊस उत्पादक शेतकऱ्यांची होणारी परवड थांबवून त्यांना दिलासा देण्याच्या उद्देशाने बंद पडलेला कारखाना पुन्हा सुरू करण्यात आला. कारखान्याच्या कामाचे काही जण राजकारण करत श्रेय घेण्याचा प्रयत्न करीत असले, तरी शेतकऱ्यांना त्यांच्या उसाचा योग्य मोबदला देणे हेच आमचे प्राधान्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.कारखान्याची आर्थिक परिस्थिती आणि साखरेचा उतारा यांचा आढावा घेऊन आगामी काळात ऊसदरात आणखी वाढ करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असेही भुमरे यांनी नमूद केले.यावेळी कारखान्याचे व्हाइस चेअरमन नंदू पठाडे, संचालक नितीन तांबे, नानासाहेब गाभुड यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here