कोल्हापूर : ‘आंदोलन अंकुश’ची ऊसदर जागर सभा; प्रतिटन ५,००० रुपये दराची मागणी

कोल्हापूर: ‘आंदोलन अंकुश’च्या माध्यमातून शिरोळ तालुक्यातील २८ गावांमध्ये जागर सभा घेण्यात आल्या आहेत. शेतकरी एकवटला आहे. त्यामुळे साखर कारखानदारांनी संघर्षाची वाट न पाहता तातडीने प्रतिटन पाच हजार रुपये दर जाहीर करावा आणि खुशाल गाळप हंगामाला सुरुवात करावी, असे आवाहन संघटनेचे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांनी केले. मौजे आगर (ता. शिरोळ) येथील ‘आंदोलन अंकुश’च्या जागर सभेत ते बोलत होते. या सभेत शेतकऱ्यांनी उसाला प्रतिटन पाच हजार रुपये दर जाहीर केल्याशिवाय ऊसतोडी स्वीकाराच्या नाहीत, असा निर्णय घेतला.

‘आंदोलन अंकुश’चे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांनी उसाची सद्यःस्थिती, दुष्काळजन्य परिस्थिती, साखरेची टंचाई, भविष्यातील साखरेचे भाव याबाबत सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले की, म्हणाले, या वर्षी उसाला प्रतिटन पाच हजार रुपये दर देणे शक्य असतानाही कारखानदारांकडून चालढकल केली जात आहे. कारखानदार संपर्कात आहेत. मात्र, दराबाबत त्यांनी तोंडावर बोट ठेवले आहे. या वर्षी गाळपाची उद्दिष्टपूर्ती करण्यासाठी कारखानदारांना धावपळ करावी लागणार आहे. शेतकरी हक्काच्या आणि घामाच्या दामासाठी एकवटत आहेत. संघर्ष टाळण्यासाठी कारखानदारांनी सकारात्मक निर्णय घ्यावा.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here