धाराशिव : एनव्हीपी शुगरकडून १७ हजार ७३१ टन उसाचे बिल अदा; शेतकऱ्यांच्या खात्यावर ५.४९ कोटी रुपये जमा

धाराशिव : तालुक्यातील जागजी येथील एनव्हीपी शुगर प्रायव्हेट लिमिटेड कारखान्याने यंदाच्या गळीत हंगामात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. ३१ ऑक्टोबरपर्यंत गाळपासाठी आलेल्या १७ हजार ७३१ टन उसाचे बिल कारखान्याने अदा केले आहे. प्रतिटन ३ हजार १०० रुपये दराने एकूण ५ कोटी ४९ लाख रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यांत जमा करण्यात आले आहेत. दिवाळीपूर्वी गाळपासाठी आलेल्या उसाच्या बिलापोटी आतापर्यंत १० कोटी ९ लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यांवर वर्ग करण्यात आले आहेत.

चाचणी गळीत हंगामापासून ऊस उत्पादकांना अवघ्या १५ दिवसांत बिल अदा करण्याची परंपरा कारखान्याने सुरू केली असून, यंदाही ही परंपरा कायम राखण्यात आली आहे.दरम्यान, ज्या शेतकऱ्यांनी अद्याप बँक खात्याशी संबंधित आवश्यक कागदपत्रे कारखान्याकडे जमा केलेली नाहीत, त्यांनी पवनराजे लोकसमृद्धी मल्टिस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड, धाराशिव येथील बँक पासबुकाची छायांकित प्रत कारखाना साइटवर जमा करावी, असे आवाहन कारखान्याचे अध्यक्ष नानासाहेब पाटील यांनी केले आहे.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here