दिवाळी महामार्गावरच साजरी करू, पण मागे हटणार नाही : राजू शेट्टी यांचा सरकार, साखर कारखानदारांना इशारा

कोल्हापूर : उसाला प्रतिटन ४ हजार ५०० रुपये पहिली उचल मिळावी, या प्रमुख मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मंगळवारी पुणे-बेंगळूरू राष्ट्रीय महामार्गावरील किणी टोल नाक्यावर चक्काजाम आंदोलन सुरु केले आहे. शेतकऱ्यांनी महामार्गावर ठिय्या मांडल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. दिवाळी महामार्गावरच साजरी करू, पण आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत मागे हटणार नाही, असा इशारा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी सरकार आणि कारखानदारांना दिला आहे.

जिल्ह्यातील साखर कारखान्यांसमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने गेल्या काही दिवसांपासून छावणी आंदोलन सुरू आहे. उसाच्या पहिल्या उचलीच्या प्रश्नावर प्रशासन आणि साखर कारखानदारांसोबत चर्चेच्या दोन फेऱ्या झाल्या. मात्र, या चर्चेतून कोणताही ठोस तोडगा निघाला नाही. त्यामुळे संघटनेने आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेत चक्काजामचे हत्यार उपसले.

ChiniMandi WhatsApp Channel

पोलिसांचा मोठा बंदोबस्त; वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने किणी टोल नाका परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. तीनशेहून अधिक पोलिसांचा फौजफाटा परिसरात तैनात करण्यात आला आहे.वाहतुकीचा खोळंबा कमी करण्यासाठी कोल्हापूरच्या दिशेने जाणारी वाहने फाटा मार्गे, तर पुण्याकडून येणारी वाहने वाघवाडी फाटा मार्गे वळविण्यात आली आहेत. त्यामुळे किणी टोल नाका परिसरातील महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे थांबली आहे.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here