नांदेड : सुभाष शुगरसह शिऊर साखर कारखान्याकडून ३२०१ रुपयांचा पहिला हप्ता अदा

नांदेड: जिल्ह्यात ऊस गळीत हंगामाला गती मिळाली आहे. याचबरोबर साखर कारखान्यांकडूून शेतकऱ्यांना ऊस बिले अदा करण्यासही सुरूवात झाली आहे. श्री सुभाष शुगर प्रा. लि. व शिऊर साखर कारखाना लि.चे अध्यक्ष सुभाषराव देशमुख यांनी दुष्काळी परिस्थितीचे भान ठेवून ऊस बिल वेळेत देण्याचे धोरण आखले आणि ते अंमलात आणले आहे. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही कारखान्यांनी पहिल्या पंधरवड्यात गाळप झालेल्या ऊसाचे प्रतिटन ३,२०१ रुपये यांप्रमाणे पहिले ऊस बिल शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग केले आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळाला असून, यंदाची दिवाळी शेतकऱ्यांसाठी खऱ्या अर्थाने गोड होणार आहे.

कारखान्याचे चेअरमन सुभाषराव लालासाहेब देशमुख व कार्यकारी संचालक सुशीलकुमार सुभाषराव देशमुख यांनी गळीत हंगामासाठी आतापर्यंत शेतकरी बांधवांनी केलेल्या सहकार्याबद्दल सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे आभार मानले आहेत. दिवाळीच्या मुहूर्तावर प्रतिटन ३,२०१ रुपये याप्रमाणे पहिले ऊस बिल अदा करून शेतकरी बांधवांना आर्थिक दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. याशिवाय कारखाना व्यवस्थापनाने यापूर्वी जाहीर केलेल्या ऊस दरानुसार दि. ३१ डिसेंबरनंतर आलेल्या उसाला अधिक शंभर रुपये आणि दि. ३१ जानेवारीनंतर आलेल्या उसाला अधिकचे दोनशे रुपये प्रोत्साहनपर ऊस खरेदी किंमत देण्यात येणार आहे. शासनाने जाहीर केलेल्या एफआरपीच्या विचार न करता जास्तीत जास्त वेळेवर मोबदला शेतकऱ्यांना देण्यासाठी देशमुख परिवाराकडून विचार केला जातो असे सांगण्यात आले.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here