महाराष्ट्र : पुणे-बंगळुरू महामार्गावर वाहनांच्या रांगा; ऊसदर आंदोलनाने जनजीवन विस्कळित

सातारा : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने उसाला प्रतिटन पहिली उचल ४५०० रुपये मिळावी, या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनामुळे पुणे – बंगळूर महामार्गावरील किणी टोलनाका ते सातारा जिल्ह्यातील खंडाळा दरम्यान वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. ऐन दिवाळीत वाहनांच्या अनेक किलोमीटर रांगा लागल्याने चित्र आहे. आंदोलकांनी मुंबईकडे जाणारी दूध आणि भाजीपाल्याची वाहनेही रोखून धरली आहेत. आंदोलनामुळे महामार्गावर खासगी कार, एसटी, प्रवासी वाहने आणि जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणारे ट्रक, कंटेनर महामार्गावर अडकले आहेत. ऊसदराचा फैसला झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही.

सर्वसामान्यांना वेठीस धरण्यासाठी आमचे आंदोलन नाही, तर शेतकऱ्यांच्या घामाला दाम मिळावे, यासाठी आहे. आज आम्ही भाजीपाला दूध वाहतूक रोखली. उद्यापासून आंदोलन तीव्र करून सुरू असलेली सर्व वाहतूक रोखू, अशी भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी मांंडली आहे. तर आंदोलनामुळे कोल्हापूरकडून येणारी वाहने मिरजमार्गे किंवा आष्टा इस्लामपूर, विटा, तासगावजवळील पाचवा मैलमार्गे पलूस, कुंडल, कराड अशी येत आहेत. ज्यांना सातारा, पुण्याकडे जायचे आहे, त्यांच्यासाठी विटामार्गे साताऱ्याकडे जाता येत आहे. येळावी फाट्यावरून कडेगावमार्गे साताऱ्याला जाता येत आहे.

ChiniMandi WhatsApp Channel

पुणे-बंगळूर महामार्गावरील वाहतूक ठप्प असतानाचा दिवाळीच्या सुट्यांनी प्रवासी वाहनांची संख्या वाढली आहे. आंदोलनाच्या कचाट्यात सर्वसामान्यांचे दैनंदिन जीवन सापडले असून, दूध-भाजीपाल्याची वाहने रस्त्यावरच आहेत. ऊसदर आंदोलनाच्या चक्का जामचा फटका आता जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यालाही बसू लागला आहे. भाजीपाल्याची वाहने आंदोलनकर्त्यांनी रोखून धरल्याने अनेक वाहने महामार्गावरच अडकून पडली आहेत. दूध खराब होण्याची शक्यता आहे, ऊसदर आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाल्याचा फटका परीक्षा देणाऱ्या विद्याथ्यर्थ्यांना बसत आहे.

दरम्यान, शेतकऱ्यांच्या उसाला दर मिळाला पाहिजे, यासाठी सरकारने तातडीने तोडगा काढण्याची मागणी भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे. आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतुकीचा खोळंबा टाळण्यासाठी वाहनधारकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन पोलिस दलाने केले आहे. साताऱ्यावरून कन्हाडला येणारी वाहतूक साताऱ्याच्या अजंठा चौकातून रहिमतपूर, पुसेसावळी, शामगाव घाट, ओगलेवाडीमार्गे कऱ्हाडला येत आहे. पाटण, कन्हाडकडून जाणारी वाहतूक मसूर फाटा, मसूर, रहिमतपूर, साताऱ्यातील अजंठा चौकातून पुण्याकडे वाहतूक वळवण्यात आली आहे.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here