लातूर : निळकंठेश्वर साखर कारखान्याची शेतकऱ्यांना दिवाळी भेट! अंतिम हप्त्यापोटी २ कोटी ९९ लाख रुपये जमा

लातूर : आमदार अभिमन्यू पवार यांच्या पुढाकारातून पुन्हा सुरू झालेल्या श्री निळकंठेश्वर शेतकरी सहकारी साखर कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. सन २०२५-२६ मधील ४२ व्या गळीत हंगामात ऊस पुरवठा केलेल्या शेतकऱ्यांसाठी कारखान्याने दिवाळीची खास भेट जाहीर केली आहे. अंतिम हप्त्यापोटी प्रतिटन १११ रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्यानुसार एकूण २ कोटी ९९ लाख रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर जमा करण्यात आले आहेत.

कारखान्याने यापूर्वी दिलेले तीन हप्ते आणि आता जाहीर केलेला अंतिम हप्ता विचारात घेता, मागील गळीत हंगामासाठी शेतकऱ्यांना प्रतिटन एकूण ३ हजार ११ रुपये असा ऊसदर मिळाला आहे. त्यामुळे परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळावा आणि त्यांना दिलासा मिळावा, या उद्देशाने कारखाना प्रशासनाने अंतिम हप्ता देण्याचा निर्णय घेतला आहे. मागील गळीत हंगामात कारखान्याने ऊस बिलापोटी एकूण ८१ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर जमा केले आहेत.

ChiniMandi WhatsApp Channel

दरम्यान, श्री निळकंठेश्वर साखर कारखान्याचा चालू गळीत हंगामही सुरळीत सुरू आहे. यंदाच्या हंगामात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन ३ हजार १५० रुपये पहिली उचल देण्याचा निर्णय कारखाना प्रशासनाने यापूर्वीच जाहीर केला आहे. मागील हंगामातील अंतिम हप्ता आणि चालू हंगामातील जाहीर केलेला पहिला हप्ता यामुळे परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळत आहे.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here