धाराशिव : उसाचे वाढे ठरतेय शेतकऱ्यांना आधार, प्रति शेकडा ४०० ते ५०० रुपये दर

धाराशिव : यंदा जिल्ह्यात सुमारे ६० हजार हेक्टर क्षेत्रावर ऊस उपलब्ध आहे. आगामी जानेवारीअखेरपर्यंत म्हणजेच पुढील साधारणतः तीन महिने हा हंगाम चालण्याचा अंदाज आहे. त्यामुळे तोपर्यंत पशुपालकांना हिरवा चारा म्हणून उसाच्या वाढ्याचा पुरवठा होत राहणार आहे. त्यामुळे पशुपालकांची चिंता काही अंशी मिटणार आहे. सध्याच्या भीषण चाराटंचाईच्या पार्श्वभूमीवर हा गळीत हंगाम शेतकरी तसेच पशुपालकांसाठी मोठा दिलासा ठरू लागला आहे. जनावरे बाळगणारे शेतकरी थेट शेतात जाऊन किंवा घरपोच वाढे खरेदी करत आहेत.

ऊसतोडणीच्या ठिकाणी थेट शेतात जाऊन खरेदी केल्यास वाढ्याच्या पेंडीला प्रतिशेकडा ४०० ते ५०० रुपये दर द्यावा लागत आहे. थेट गोठ्यापर्यंत वाढे हवे असल्यास प्रतिशेकडा ९०० ते १००० रुपये मोजावे लागत आहेत. पावसाळ्यापर्यंत जनावरांच्या चाऱ्याची सोय व्हावी यासाठी पशुपालक वाढे खरेदी करून त्याची गंजी लावून साठवणूक करण्याला प्राधान्य देत आहेत. दुष्काळी परिस्थितीत जनावरांसाठी मोठा आधार ठरत आहेत. पुढील तीन महिने गळीत हंगाम सुरू राहणार असल्याने पशुपालकांना हिरवा चारा सहज उपलब्ध होत राहील. त्यामुळे त्यांची चिंता काही अंशी मिटला आहे असे नॅचरल शुगरचे कार्यालयीन अधीक्षक श्रीराम साळुंके यांनी सांगितले. भूम येथील पशुपालक अमोल माळी यांनी सांगितले की, माझ्याकडे चार-पाच जनावरे असून, आता प्रतिशेकडा एक हजार रुपये दराने घरपोच उसाचे वाढे खरेदी करून साठविले आहेत. थेट शेतात ५०० रुपयांना मिळतात, पण वाहतुकीचा खर्च आपल्यालाच करावा लागतो.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here