पुणे : ऊस बिले देण्यात भीमा पाटस कारखान्याची आघाडी, प्रतिटन ३५०० रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर

पुणे : एमआरएन भीमा शुगर अँड पॉवर प्रा. लि. संचलित भीमा सहकारी साखर कारखान्याने यंदाच्या गळीत हंगामात ८ ऑक्टोबरपासून गाळपाला सुरुवात केली आहे. कारखान्याने अवघ्या ३१ दिवसांत, म्हणजे ७ नोव्हेंबरपर्यंत कारखान्याने २ लाख ७३ हजार १०१ मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे. या गाळपातून २ लाख ६३ हजार ५० क्विंटल साखरेचे उत्पादन घेण्यात आले असून, सरासरी साखर उतारा ९.७१ टक्के नोंदविण्यात आला आहे. याचबरोबर जिल्ह्यात सर्वप्रथम ऊस बिल अदा करण्याचा मान मिळवत कारखान्याने यंदा हंगामात आघाडी घेतली आहे. ३१ ऑक्टोबरअखेर गाळप उसासाठी प्रति टन ३ हजार ५०० रुपयांप्रमाणे ऊस बिल शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर जमा करण्यात आले आहे.

कारखान्याने १ नोव्हेंबरनंतर गाळपासाठी आलेल्या उसाचे पेमेंटही आठवड्याच्या अंतराने करण्याचे नियोजन कारखाना व्यवस्थापनाने केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना ऊस बिलासाठी दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागणार नाही. वेळेत पैसे मिळाल्याने रब्बी हंगामातील शेतीकामे, खते-बियाणे खरेदी आणि इतर आर्थिक गरजा भागविण्यास मदत होणार आहे. कारखान्याचा दैनिक साखर उतारा १०.४७ टक्क्यांवर पोहोचला आहे. गाळपाबाबतही भीमा पाटसने दमदार कामगिरी केली असून, पुणे जिल्ह्यात गाळपामध्ये तिसरा क्रमांक पटकावला आहे. दौंडचे आमदार राहुल कुल यांचे मार्गदर्शन, तसेच कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी आणि कामगारांचे परिश्रम यामुळे ही कामगिरी शक्य झाल्याचे कारखाना प्रशासनाने म्हटले आहे. शेतकऱ्यांना कारखान्याने आर्थिक दिलासा दिला आहे. त्यामुळे ऊस उत्पादकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here