बेळगाव : बेडकिहाळ (ता. निपाणी) येथील व्यंकटेश्वरा पॉवर प्रोजेक्ट साखर कारखान्याकडे गाळपास येणाऱ्या उसाला पहिली उचल प्रतिटन ३८०० रुपये दिले जाणार आहेत. गळीत हंगाम संपल्यानंतर दुसरी उचल म्हणून प्रतिटन १०० रुपये देण्यात येणार आहेत. तसेच २०२६-२७ मध्ये उत्पादित साखरेचा सरासरी विक्री दर प्रतिकिलो ५० रुपयांपेक्षा अधिक राहिल्यास, पुढील ऊस गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वी तिसरी उचल म्हणून प्रतिटन ३०० रुपये दिले जाणार आहेत.
कारखान्याचे कार्यकारी संचालक स्वरूप महाडिक यांनी सोमवारी (ता. ९) कारखाना कार्यस्थळावर ही घोषणा केली. कारखान्याने २०२६-२७ च्या गळीत हंगामासाठी प्रतिटन एकूण ४२०० रुपये दर जाहीर केला आहे. कर्नाटकातील इतर कारखान्यांच्या कारखान्यांच्या तुलनेत या कारखान्याचा दर सर्वाधिक असल्याचे दिसून येत आहे. सुरुवातीला ३,९०० रुपये, नंतर १०० रुपये आणि ३०० रुपये अशाप्रकारे शेतकऱ्यांना एकूण प्रतिटन ४२०० रुपये दर मिळणार आहे, असे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांनी आपला ऊस गाळपासाठी व्यंकटेश्वरा कारखान्याकडे पाठवावा, असे आवाहनही महाडिक यांनी केले.


















