कर्नाटक : उसाला प्रतिटन १००० रुपये जादा दर देण्याची शेतकरी नेते चुन्नाप्पा पुजारी यांची मागणी

बेळगाव : ऊस दरासह विविध मागण्यांसाठी सुरू असलेले ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात आले आहे. मात्र, उसाला प्रतिटन किमान एक हजार रुपये अतिरिक्त दर देण्याची आमची मागणी कायम आहे. आगामी हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी याबाबत घोषणा करावी. बेळगाव येथील आगामी हिवाळी अधिवेशनात ५० लाखांहून अधिक शेतकरी, युवक आणि महिलांच्या सहभागातून अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शेतकरी नेते चुन्नाप्पा पुजारी यांनी दिला.

पुजारी यांनी सांगितले की, महाराष्ट्रात ऊस पीक घेण्यासाठी १३ ते १४ महिन्यांचा कालावधी लागतो, तर कर्नाटकातील शेतकरी १० ते ११ महिन्यांत ऊस पिकवतात. तरीही महाराष्ट्राच्या तुलनेत अधिक चांगला दर मिळविण्यासाठी आमचा लढा सुरू आहे. साखर कारखान्यांना मिळणाऱ्या प्रत्येक १०० रुपयांच्या नफ्यातील ७५ रुपये शेतकऱ्यांना मिळावेत, अशी आमची मागणी आहे. आतापर्यंतच्या आंदोलनामुळे पहिल्या टप्प्यात प्रतिटन ३०० ते ४०० रुपये आणि पुढील टप्प्यात आणखी ५०० रुपये अतिरिक्त दर मिळविण्यात शेतकरी यशस्वी झाले आहेत असे पुजारी यांनी सांगितले.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here