पुणे : कर्मयोगी साखर कारखान्याकडून शेतकऱ्यांना प्रतिटन १५० रुपयांचा दुसरा हप्ता जमा; एकूण ऊसदर ३,३५० रुपये

पुणे : कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखाना लिमिटेड, सहयोगी ओंकार शुगर अँड डिस्टिलरी पॉवर प्रा. लि., युनिट क्रमांक ११, इंदापूर यांच्या वतीने गळीत हंगाम २०२५-२६ मध्ये ऊसपुरवठा केलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ऊसबिलाचा दुसरा हप्ता प्रतिटन १५० रुपये जमा करण्यात आला आहे. यापूर्वी अदा करण्यात आलेल्या प्रतिटन ३,२०० रुपयांसह शेतकऱ्यांना आतापर्यंत एकूण प्रतिटन ३,३५० रुपये ऊसदर देण्यात आला आहे.

ओंकार ग्रुपचे अध्यक्ष बाबूराव बोत्रे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली समूहाने साखर उद्योगाच्या विस्तारासोबतच शेतकरी हिताला नेहमीच प्राधान्य दिले आहे. आगामी गळीत हंगामाच्या पार्श्वभूमीवर ऊस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य दर देणे, ऊसबिलांची रक्कम वेळेत अदा करणे आणि कारखान्याच्या कामकाजात पारदर्शकता राखणे यावर व्यवस्थापनाचा विशेष भर असल्याचे सांगण्यात आले.

ChiniMandi WhatsApp Channel

कारखान्याच्या प्रगतीमध्ये ऊसतोडणी व वाहतूक ठेकेदार, कामगार आणि प्रशासन या सर्व घटकांची भूमिका महत्त्वाची असते. या सर्वांमध्ये योग्य समन्वय आणि परस्पर विश्वास कायम ठेवून कारखान्याची वाटचाल अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न सुरू आहे.ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या कष्टाचा योग्य मोबदला मिळावा आणि त्यांच्या आर्थिक गरजांना हातभार लागावा, या उद्देशाने दुसऱ्या हप्त्याची रक्कम थेट बँक खात्यावर जमा करण्यात आल्याची माहिती कारखाना व्यवस्थापनाकडून देण्यात आली.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here