धाराशिव : जिल्ह्यात नॅचरल, कचेश्वर गाळपात आघाडीवर, नऊ कारखान्यांकडून ९.४१ लाख टन ऊस गाळप

धाराशिव : मागील वर्षी जिल्ह्यातील १७ साखर कारखाने गाळप हंगामात सहभागी झाले होते. यंदा चालू गळीत हंगाम २०२६-२७ मध्ये आतापर्यंत नऊ कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे. हंगामाच्या सुरवातीच्या टप्प्यात डॉ.बाबासाहेब आंबेडकर कारखान्याने सर्वाधिक ८.८८ टक्के साखर उतारा नोंदविला आहे. एकूण गाळपाच्या बाबतीत नॅचरल शुगर (रांजणी) आणि कंचेश्वर शुगर आघाडीवर असल्याचे चित्र आहे. १५ नोव्हेंबरपर्यंत नऊ कारखान्यांनी मिळून ९ लाख ४१ हजार ८१५ मेट्रिक टन उसाचे गाळप केले असून, त्यातून ७ लाख ४९ हजार ९६० क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. हंगामाच्या सुरवातीच्या टप्प्यात जिल्ह्याचा सरासरी निव्वळ साखर उतारा ७.९६ टक्के नोंदविण्यात आला आहे.

जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे गाळप वेगाने सुरू आहे. गाळप करणाऱ्या नऊ कारखान्यांपैकी चार सहकारी आणि पाच खासगी कारखान्यांची एकत्रित दैनिक गाळप क्षमता ३४ हजार ५०० टन आहे. सहकारी साखर कारखान्यांची दैनिक गाळप क्षमता १२,५०० टन असून, त्यांनी आतापर्यंत ३,१२,००६ टन उसाचे गाळप केले आहे. त्यातून २,३८,७०० क्विंटल साखरेचे उत्पादन झाले असून, सरासरी साखर उतारा ७.६५ टक्के आहे. तर पाच खासगी कारखान्यांची दैनिक गाळप क्षमता २२,००० टन आहे. या कारखान्यांनी ६,२९,८०९ टन उसाचे गाळप करून ५,११,२६० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. त्यांचा सरासरी साखर उतारा ८.१२ टक्के नोंदविण्यात आला आहे. गाळपाच्या बाबतीत रांजणीच्या नॅचरल शुगर आणि कंचेश्वर शुगरने आघाडी घेतली आहे.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here