सांगली : शेतकऱ्यांना दिलासा, राजारामबापू कारखान्याकडून ३९०० रुपये पहिली उचल जाहीर

सांगली : लोकनेते राजारामबापू पाटील यांचा आदर्श आणि माजी मंत्री, आमदार जयंतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याने सातत्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हित जपत, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अग्रेसर ऊसदर दिलेला आहे. यावर्षीही ही परंपरा कायम राहील. कारखान्याने गळीत हंगाम २०२६-२७ मध्ये कारंदवाडी युनिटकडे तसेच साखराळे, वाटेगांव-सुरुल युनिटकडे गाळपास येणाऱ्या उसाला पहिली उचल प्रतिटन रुपये ३९०० जाहीर केल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष प्रतिक पाटील यांनी दिली. पत्रकार परिषदेला कारखान्याचे उपाध्यक्ष विजयराव पाटील, संचालक देवराज पाटील, प्रदिपकुमार पाटील, कार्तिक पाटील, विठ्ठल पाटील, प्र. कार्यकारी संचालक विजय मोरे, मुख्य लेखापाल संतोष खटावकर उपस्थित होते.

प्रतिक पाटील म्हणाले की, राजारामबापू पाटील साखर कारखान्याने यावर्षीपासून कारखान्यास सातत्याने ऊस पुरवठा करणाऱ्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी तिहेरी लाभ देणारी राजारामबापू कुटुंब लाभ योजनाही लागू केली आहे. कारखान्याची वाटचाल शेतकरी, सभासद, कामगार आणि परिसराच्या सर्वांगीण विकासाशी जोडली आहे. शेतकऱ्यांनी कारखान्यावर दाखवलेला विश्वास, हीच आमची सर्वात मोठी ताकद आहे. हा विश्वास अधिक दृढ करण्यासाठी शेतकऱ्यांना कष्टाचा योग्य मोबदला मिळावा, त्यांच्या कुटुंबाची प्रगती व्हावी आणि ग्रामीण अर्थव्यवस्था सक्षम व्हावी यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. शेतकऱ्यांनी सर्व ऊस आपल्या साखर कारखान्यास देवून सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here