जालना : बंद पडलेला जालना सहकारी साखर कारखाना पुन्हा सहकारी तत्त्वावर सुरू करण्याची मागणी कारखान्याच्या सभासदांसह मान्यवरांनी केली. ज्येष्ठ नेते. दिवंगत बाळासाहेब पवार यांच्या पुण्यतिथीनिमित्त बुधवारी कारखान्यासमोर आदरांजली सभा झाली. यावेळी कारखाना बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष अंकुशराव देशमुख, अॅड. सोपानराव भांदरगे, कमलाकर अंभोरे, मारोतराव मदन, सुरेश खडके, राजेंद्र जैस्वाल, कैलास देशमुख, सांडूजी दाभाडे, जगन्नाथ काळे, तात्यासाहेब भांदरगे, सलीम काजी हसनाबादकर आदी उपस्थित होते.
प्रारंभी कारखाना परिसरातील बाळासाहेब पवार यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी ज्ञानेश्वर भांदरगे, अंकुशराव राऊत, सुभाष कोळकर, कारभारी फुलारी, देविदास बोंबले आणि भारत भांदरगे यांनी मनोगत व्यक्त केले. कारखाना पुन्हा सुरू करणे आणि शेतकऱ्यंचे हित साधणे हीच बाळासाहेब पवार यांना खरी आदरांजली ठरेल, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले. कार्यक्रमाला लक्ष्मण शिंदे, अंकित आबड, चेतन खंडेलवाल, अंजेभाऊ चव्हाण, शेतकरी व कामगार उपस्थित होते. नारायण वाढेकर यांनी सूत्रसंचालन केले. सोपान तिरूखे यांनी आभार मानले.


















