ऊस दरवाढप्रश्नी आम आदमी पक्षाची सरकार विरोधात निदर्शने

हरिद्वार : आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रविवारी पक्ष कार्यालयासमोर ऊस दरवाढ आणि शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांबाबत सरकारविरोधात धरणे आंदोलन करत घोषणाबाजी केली. आपचे प्रदेश उपाध्यक्ष नरेश शर्मा यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१९ मध्ये सांगितले होते की, देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न २०२२ मध्ये दुप्पट होईल. मात्र, शेतकऱ्यांचे उत्पन्न नव्हे तर खर्च दुप्पट झाला आहे. ऊर्जेचे भंडार असलेल्या उत्तराखंड राज्यात आता सर्वाधिक वीज महाग आहे. खते, बियाणे, पेट्रोल-डिझेल अशा सर्व घटकांचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे शेतकरी नाईलाजाने रस्त्यावर उतरत आहे.

लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, नरेश शर्मा यांनी सांगितले की, गव्हाचे पिक पावसामुळे पूर्णपणे खराब झाले आहे. त्यामुळे सरकारने त्वरीत नुकसान भरपाई देण्याची गरज आहे. जिल्हाध्यक्ष संजय सैनी म्हणाले, जेव्हा आमदारांच्या पैशाचा प्रश्न असतो तेव्हा सर्वजण एकत्र असतात. यावेळी विधानसभा अध्यक्ष हरिद्वार सती, संजू नारंग, पवन धिमान, अंकुर बागडी, खलील राणा, खलिद हसन, हरिश्चंद्र, उस्मान मलिक, तहरेज आलम, मनोज कश्यप, फिरोज जमशेद, रवि चौहान, जाकीर हसन, आशिष गौडा, रेखा देवी आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here