जिजामाता साखर कारखाना सुरु होण्यासाठी प्रयत्न करा: बाळासाहेब पाटील

बुलढाणा: दुसरबीड (ता. सिंदखेडराजा) येथील जिजामाता सहकारी साखर कारखाना पुन्हा सुरु होण्यासाठी शक्य तितके प्रयत्न करावेत, योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी संबंधित विभागाला दिले. या कारखान्याची ओळख विदर्भातील पहिला साखर कारखाना अशी असल्याने हा कारखाना पूर्ववत सुरु होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. विदर्भातील शेतकऱ्यांना ठोक पैसे व दुसरबीड (ता. सिंदखेडराजा) रोजगार उत्पन्न तसेच सहकार क्षेत्रातील साखर कारखान्यांना चालना देण्यासाठी जिजामाता साखर कारखाना सुरु झाला पाहिजे.

सिंदखेडराजाचे आम. डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी हा जिजामाता सहकारी साखर कारखाना पूर्ववत सुरु करणे हे आपले ड्रीम प्रोजेक्ट असल्याचे जाहीर केले. त्यानुसार हालचाली सुरु झाल्या. बैठकीत हा साखर कारखाना पूर्ववत सुरु करण्याच्या दृष्टीने सर्व शक्यतांवर चर्चा करण्यात आली. सहकार विभागाने साखर कारखाना सुरु करावा, अशी आग्रही मागणी शिंगणे यांनी केली.

त्यानुसार पालकमंत्री डॉ शिंगणे यांनी कारखान्याच्या अनुषंगाने पाठपुरावा सुरु केेला आहे. त्याचाच एक भाग म्हणून ही बैठक सहकारमंत्री यांनी घेतली. बैठक़ीत साखर कारखाना आहे त्याच ठिकाणी कशाप्रकारे पूर्ववत सुरु करता येईल, यासंदर्भात तातडीने उपाययोजना करण्यात याव्यात, अशा सूचना अधिकार्‍यांना देण्यात आल्या आहेत.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here