अहिल्यानगर : ज्ञानेश्वर साखर कारखान्यासाठी २२ अर्ज दाखल, सोनई गटातून माजी मंत्री गडाख यांचा अर्ज

अहिल्यानगर : ज्ञानेश्वर व मुळा साखर कारखान्याची निवडणुक लागली. सत्ताधारी गटाकडून उमेदवारांची चाचपणी व विरोधी गटाकडून उमेदवारांची शोधाशोध सुरु असल्याची लगबग सुरू आहे. तिसऱ्या दिवशी सोनई गटातून माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्यासह खरवंडी गटातून दोन विद्यमान संचालकांचे अर्ज दाखल झाले आहेत. ज्ञानेश्वर साखर कारखान्यांसाठी एकूण २२ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.’मुळा’ करीता एकूण १८२ अर्जाची विक्री झाली. सोनई गटातून माजी मंत्री गडाख, खरवंडी गटातून भाऊसाहेब मोटे व बापूसाहेब शेटे यांचे अर्ज जमा झाले आहेत, अशी माहिती निवडणूक निवडणूक निर्णय निर्णय अधिकारी औ सुधीर पाटील यांनी ‘सकाळ’ शी बोलताना सांगितले.

‘ज्ञानेश्वर’ करिता कुकाणे गटातून-८, शेवगाव-३, शहरटाकळी-२, नेवासे-२, वडाळा-२, पणन संस्थेकरीता-२, इतर मागासवर्गीय २ व मागास प्रवर्ग करिता १ अर्ज दाखल झाल्याचे सहायक निबंधक देविदास घोडेचोर यांनी सांगितले. गुरुवार (ता. २८) रोजी आमदार विठ्ठलराव लंघे व उद्योजक प्रभाकर शिंदे यांच्या उपस्थितीत नेवासे येथील बैठकीत दोन्ही कारखान्यास सक्षम उमेदवार देऊन निवडणूक लढविण्याची घोषणा करण्यात आल्याने दोन्ही कारखान्याच्या गटात विरोधी कार्यकर्ते उमेदवारांची शोधाशोध करू लागले आहेत.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here