अहिल्यानगर : कारखान्याच्या आगामी हंगामासाठी प्राथमिक तयारीला वेग आला असून, ऊसतोड मजुरांच्या टोळ्यांचे नियोजन सुरू झाले आहे. बुधवारी ऊसतोडणी टोळी मुकादमांना आगाऊ रक्कम देण्यात आली. अगस्ति साखर कारखाना हा तालुक्यातील अर्थकारणाचा कणा मानला जातो. या कारखान्यामुळे हजारो कुटुंबांचे संसार फुलले असून स्थानिक बाजारपेठेला मोठा आधार मिळतो. मात्र, कारखान्याची चिमणी थंडावली तर त्याचे परिणाम गंभीर होणार असल्याचेही गायकर यांनी स्पष्ट केले.
साखर कारखाना अडचणीत असून कामगारांना ले-ऑफ देण्यात आला आहे. कारखान्याचे आर्थिक नुकसान कमी व्हावे हा त्यामागील उद्देश आहे. दिवाळीपूर्वी राहिलेले दोनशे रूपये प्रतीटन शेतकऱ्यांना देऊन दिलेला शब्द पाळू, असा विश्वास गायकर यांनी दिला. यावेळी ज्येष्ठ संचालक पर्बत नाईकवाडी, अशोक देशमुख, विकास शेटे, बाळासाहेब नाईकवाडी, कार्यकारी संचालक सुधीर कापडणीस, मुख्य लेखापाल विजय सावंत, गबरू मुकादम आदींसह ऊसतोडणी कामगार प्रतिनिधी उपस्थित होते.


















