बागपत आणि रमाला साखर कारखान्याचा गाळप हंगाम सुरु

114

बागपत: शासनाच्या आदेशावर सोमवारी सकाळी बागपत आणि रमाला साखर कारखान्याच्या गाळप हंगामाचा शुभारंभ खासदार डॉ. सत्यपाल सिंह आणि डीएम शकुंतला गौतम यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. सर्वात पहिल्यांदा रमाला साखर कारखान्याच्या गाळप हंगामाला सुरुवात झाली. यावेळी आयोजित कार्यक्रमामध्ये खासदार आणि डीएम यांनी हवन मध्ये आहुती दिली आणि गाळप हंगाम सुरु झाला. खासदारांनी नियमानुसार जास्तीत जास्त उसाचे गाळप करण्याचे निर्देश दिले. कार्यक्रमामध्ये खासदार डॉ. सत्यपाल सिंह, डीएम शकुंतला गौतम, उस समिती चेअरमन कृष्णपाल सिंह, विनोद कुमार, कारखाना व्यवस्थापक आर के जैन आदी उपस्थित होते.

 

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here