पंजाब: ऊसाच्या थकबाकी विरोधात शेतकर्‍यांची निदर्शने

87

मुकेरिया, पंजाब : शेतकरी संघटनांकडून साखर कारखान्यासमोर 55.31 करोड रुपये थकबाकीच्या मागणी साठी निदर्शने करण्यात आली. आंदोंलनकर्त्यांनी 15 दिवसाच्या आत थकबाकी न भागवल्यास निदर्शने अधिक तिव्र करण्याचा इशारा दिला. शेतकरी मजूर संघर्ष समिती आणि शेतकरी मजूर हितकार सभेच्या नेतृत्वामध्ये शेतकर्‍यांनी मुकेरिया साखर कारखाना व्यवस्थापनाच्या कार्यालयाला घेराव घातला. आंदोलनकर्त्यांनी कारखाना व्यवस्थापन आणि राज्य सरकार विरोधी घोषणाबाजी केली आणि देय थकबाकीची मागणी केली.

शेतकरी नेते जसवीर सिंह गोराया आणि ओमकार सिंह पूराना भंगाला यांनी सांगितले की, कारखाना व्यवस्थापनाने शेतकर्‍यांच्या मागणीला दुर्लक्ष केले. त्यानीं आरोप केला की, कारखाना व्यवस्थापनाने आपल्या गेल्या आश्‍वासनाला पूर्ण केले नाही आणि 25 करोड रुपयांऐवजी केवळ 14 करोड रुपयांची थकबाकी भागवली. कारखान्याच्या अधिक़ार्‍यांनी सांगितले की, कारखान्याकडून त्यांच्या क्षमतेनुसार उर्वरीत पैसे भागवले जात आहेत. त्यांनी शेतकर्‍यांना आश्‍वासन दिले की, सर्व थकबाकी ऑक्टोबर च्या शेवटपर्यंत भागवली जाईल.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here