कोरोना चा उत्तर प्रदेश मधील गूळ उद्योगालाही फटका

312

लखनऊ: कोरोना च्या वैश्विक महामारी ने पूर्ण जग भरात उच्छाद मांडला आहे. त्यामुळे सर्व उद्योगांना याचा फटका बसला आहे. व आर्थिक परिस्थिती खूप खालावली आहे. या पासून साखर उद्योग हि सुटलेला नाही, त्यासोबतच गूळ उद्योगाला सुद्धा या लॉकडाउन चा काळात फटका बसला आहे.

उत्तर प्रदेश मधील बहुतेक छोटे ऊस उत्पादक स्थानिक गुळाच्या घान्या वरती किंवा खांडसरी साखर उत्पादक युनिट्सवर ज्याला कोहलू म्हणतात, जे कमी दराने ऊसाची खरेदी करतात. पण शेतकऱ्यांना गरजेच्या वेळी लागणारे पैसे साखर कारखान्यांच्या तुलनेत लवकर मिळतात.

परंतु हे कोहलूही बंद आहेत, त्या मुळे शेतकऱ्यांना साखर साखर कारखान्यांन शिवाय दुसरा पर्याय नाही. गुळाच्या उत्पादक युनिट्स मधील कामगार तुकड्यांमध्ये कापणीच्या वेळी आणि पेरणीच्या हंगामात शेतात काम करायचे. लॉकडाऊनच्या पहिल्या काही दिवसांत ते सर्व आपापल्या गावी परत गेले. आता, जरी सरकारला हवे असेल तर ते परत येणार नाहीत आणि यामुळे पैसे आणि कामगार या दोहोंची गूळ उद्योगासाठी कमतरता आहे.

लॉकडाउन च्या आधी गूळ उत्पादक शेतकयांना २४०-५० प्रति क्विंटल दर मिळत होता. तो लॉकडाउन नंतर जे काही मोजके कोहलू चालू होते त्यांचा कडून २०० वरती आला. तसेच लॉकडाउन मुळे गावागावातील गुळाचे मार्केट्स बंद झाले. त्यामुळे गुळाची मागणी घटली. मुझफ्फरनगर, मेरठ,खतोली सारखे गुळाचे मोठे मार्केट मध्ये सुद्धा उचल नसल्याने याचा फटका गूळ उत्पादनाला बसला.

ऊस तंज्ञानांच्या मतां नुसार उत्तर प्रदेश चे कोहलू बंद असलेने ऊसाची विभागणी कमी झाली परिणामी जास्ती ऊसाचे गाळप होण्याची शक्यता आहे. पश्चिम उत्तर प्रदेश मधील काही कारखाने जून महिन्यापर्यंत जाऊन पोचतील. त्यामुळे उसाचे गाळप “१०७० ते १०८० लाख मेट्रिक टन” चे वाढून “१०८० ते ११२० लाख मेट्रिक टन” पर्यंत जाऊ शकते, तसेच साखर उत्पादन १२५ लाख मेट्रिक टन किंवा त्यापेक्षा जास्ती पर्यंत पण जाऊ शकते.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here