धाराशिव : गूळ पावडर उद्योगाला राज्य सरकारने धोरणात्मक पाठबळ देण्याची मागणी

धाराशिव : इनोव्हेटिव्ह जॅगरी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन, महाराष्ट्र व कर्नाटकचे कार्याध्यक्ष अॅड. व्यंकटराव गुंड यांनी लातूर येथे महाराष्ट्राचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची भेट घेऊन गुळ पावडर उद्योगासमोरील विविध समस्या आणि उद्योगाच्या विकासासाठी आवश्यक मागण्यांवर चर्चा केली.यावेळी अॅड. गुंड यांनी गूळ पावडर उद्योगासंदर्भातील एफआरपी विषयक प्रश्न, उद्योगाला आवश्यक असलेले धोरणात्मक पाठबळ तसेच इथेनॉल निर्मितीसाठी गूळ पावडर कारखान्यांना आवश्यक परवानग्या देण्याची मागणी मांडली. उद्योगाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध मागण्यांचे निवेदनही सहकार मंत्र्यांना सादर करण्यात आले.

बैठकीस आमदार विक्रम काळे, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, राज्य सहकारी शिखर बँकेचे माजी संचालक अविनाश महागावकर, साहेबराव पाटील, उद्योजक व्ही. पी. पाटील यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. संघटनेने मांडलेल्या मागण्या आणि उद्योगासमोरील अडचणींची सहकार मंत्री पाटील यांनी गांभीर्याने दखल घेतली. गूळ पावडर उद्योग हा शेतकरी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेशी निगडित महत्त्वाचा घटक असून त्याच्या विकासासाठी शासन सकारात्मक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. संबंधित विभागांशी चर्चा करून मांडण्यात आलेल्या विषयांवर अनुकूल निर्णय घेण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. गूळ पावडर उद्योगातील अडथळे दूर करून शेतकऱ्यांना अधिक लाभदायी पर्याय उपलब्ध व्हावेत, या दृष्टीने ही बैठक महत्त्वपूर्ण ठरणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here