धाराशिव : रुपामाता नॅचरलचे मिल रोलर पूजन उत्साहात, गाळप क्षमता प्रतिदिन २८०० टन

धाराशिव : तालुक्यातील पाडोळी (आ.) येथील रुपामाता नॅचरल शुगर यु. क्र. ०१ येथे गाळप हंगाम २०२६-२७ निमित्त मिल रोलर पूजन समारंभ जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर गुंड आणि ह.भ.प. बाबुराव पुजारी यांच्या हस्ते पार पडला. उद्योग रुपामाता समूहाचे संस्थापक तथा भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य अॅड. व्यंकट गुंड पाटील आणि कार्यकारी संचालक अॅड. अजित गुंड पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उद्योग समूहाची वाटचाल सुरू आहे. यावेळी सुधाकर गुंड म्हणाले, कारखान्याची ऊस गाळप क्षमता. २८०० टन प्रतिदिन करण्यात आली आहे.

ते म्हणाले, या विस्तारामुळे परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा ऊस वेळेत, जलद गतीने आणि पूर्ण क्षमतेने गाळप होणार आहे. याप्रसंगी जनरल मॅनेजर एम.जी. राठोड, चीफ इंजिनिअर अविनाश समुद्रे, डेप्युटी चीफ इंजिनिअर संजय गुंड पाटील, चीफ केमिस्ट दिगंबर आवताडे, सुरक्षा अधिकारी लोकरे, रुपामाता परिवारातील हर्षल मोहिते व अनिकेत नवले विभागप्रमुख, पदाधिकारी, यांच्यासह अधिकारी, कर्मचारी, कामगार, ऊस उत्पादक शेतकरी, वाहतूक ठेकेदार आणि कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजानन पाटील गांनी केले

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here