धाराशिव : उसतोड उचलीच्या पैशांवरून कामगाराच्या मुलाचे अपहरण, मुकादमासह चौघांवर गुन्हा

धाराशिव : ऊसतोडीसाठी उचल म्हणून घेतलेले पैसे परत दे, नाहीतर कामावर ये, असा तगादा ऊस तोडणी मजुराला लावत त्याच्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलाला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाणीची घटना पळसप येथे घडली. याप्रकरणी पीडित मुलाच्या आईच्या फिर्यादीवरून ढोकी पोलिस ठाण्यात २४ जुलै रोजी चौघांविरुद्ध अपहरणासह विविध गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. कौशल्या सुनील काळे यांनी याविषयी फिर्याद दिली आहे. “उचलीचे पैसे दे आणि मुलाला घेऊन जा, नाहीतर मुलाला सोडणार नाही,” अशी धमकीही संशयितांनी दिली. ४ जुलै रोजी दुपारी दीडच्हाया सुमारास प्रकार घडला.

पोलिसांनी सांगितले की, घटना घडल्यानंतर कुटुंबाकडून सुरुवातीला वाद मिटवण्याचा व मुलाचा शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, आरोपींकडून सातत्याने धमक्या येत असल्याने अखेर फिर्यादी कौशल्या काळे यांनी २४ जुलै रोजी ढोकी पोलिस ठाणे गाठून काय घडले याची ममाहिती दिली. पळसप येथे ४ जुलै रोजी दुपारी सुमारे १:३० च्या सुमारास संशयितांनी त्याला गाठले. “ऊसतोडीचे उचलीचे घेतलेले पैसे परत दे, नाहीतर कामाला ये असे म्हणत संशयितांनी सचिन यास लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली व बळजबरीने स्वतःसोबत पळवून नेले. मुलाचे अपहरण केल्यानंतर संशयितांनी कौशल्या यांच्याशी संपर्क साधून उचलीच्या पैशांची मागणी केली. पैसे दे आणि मुलाला घेऊन जा, नाहीतर आम्ही मुलाला सोडणार नाही, अशी धमकी देत मुलाला डांबून ठेवल्याचा आरोप तक्रारदार आईने केला आहे.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here