Digital India: उत्तर प्रदेशातील ऊस उत्पादक शेतकरी होताहेत हायटेक

राज्याचे ऊस तथा साखर आयुक्त संजय भुसरेड्डी यांनी सांगितले की, केंद्र सरकारचा ‘डिजिटल इंडिया‘ कार्यक्रम भारताला डिजिटल रुपात सशक्त समाज तथा ज्ञानावर आधारित अर्थव्यवस्थेमध्ये बदलण्याचा एक मुख्य कार्यक्रम आहे. राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रेरणेतून डिजिटल क्रांतीच्या माध्यमातून राज्याची प्रतिमा बदण्यासाठी तसेच ग्रामीण भागात तंत्रज्ञानाचा प्रसार करण्याचा संकल्प घेण्यास कटीबद्ध आहेत. आज उत्तर प्रदेशचे ऊस उत्पादक शेतकरी स्मार्ट आणि हायटेक होत आहेत. इंटरनेट तसेच स्मार्ट फोनच्या माध्यमातून आपल्या ऊस वितरणाशी संबंधित माहिती मिळवू शकतात. समस्या सोडविण्याची मागणी केली जात आहे. या उद्दिष्टाची पूर्तता करणे, पारदर्शकता प्रस्थापित करणे आणि उत्पादक शेतकर्‍यांच्या ऊस पुरवठा व्यवस्थेत सुसूत्रता आणणे या उद्देशाने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना नावीन्यपूर्ण सेवांद्वारे योग्य वेळी माहिती देणे हे ऊस विकास विभागाचे ध्येय आहे. आता शेतकऱ्यांच्या मोबाईलवर गळीत हंगाम २०२२-२३ मधील एसएमएसद्वारे ऊसाच्या स्लीप पाठवल्या जात आहेत.

ऊस आयुक्तांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की, त्यांनी SGK (Smart Ganna Kishan) वर नोदणीकृत मोबाईल नंबरची तपासणी करावी. जर आपला मोबाईल क्रमांक चुकला असेल तर ऊस पर्यवेक्षक अथवा समित्यांच्या सचिवाच्या माध्यमातून मोबाईल क्रमांक अपडेट करून घ्यावा. ते म्हणाले की, जर मोबाईलच्या एसएमएसचा इनबॉक्स भरलेला असेल, मोबाईल स्वीच ऑफ होणे, नेटवर्क क्षेत्राबाहेर असणे अथवा डीएनडी अॅक्टिव्हेट होणे अशा कारणांनी एसएमएसवरील तोडणी स्पील २४ तासानंतर स्वतःहून नष्ट होईल असे सांगण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्यांना ऊस तोडणीविषयक माहिती मिळणार नाही. त्यामुळे मोबाईल चार्जिंग करून आणि अपडेट ठेवावा. त्यावर डीएनडी अॅक्टिव्हेट करू नये असे सांगण्यात आले.

त्यांनी असेही सांगितले की, एसएमएस ऊस तोडणी प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शी आहे. आणि या व्यवस्थेअंतर्गत शेतकऱ्यांना तत्काळ पावती मिळत आहे. वेळेवर ऊस तोडणी स्लीप मिळत असल्याने शेतकरी ठराविक कालावधीत कारखान्याला ऊस पाठवू शकतात. त्यातून ऊस वाळण्याच्या समस्येची सोडवणूक होत आहे. एसएमएसद्वारे तोडणी पावतीद्वारे शेतकऱ्यांना ऊस माफियांपासूनही दिलासा मिळाला आहे. आता शेतकऱ्यांना तोडणी स्लीप काढून घेणे, फाटणे वा इतर नुकसानीपासून बचाव करणे शक्य झाले आहे.

या व्यवस्थेमध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सर्व सुचना ऑनलाइन www.caneup.in आणि E-GannaApp च्या माध्यमातून घरबसल्या मिळत आहेत. राज्यातील ४६.४२ लाख ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सध्याच्या गळीत हंगामाच्या सुरुवातीला आतापर्यंत इंडेंट जारी करणारे ४२ साखर कारखाने शेतकऱ्यांना जवळपास १० लाख ऊस तोडणी पावत्या जारी करणार आहे. यातील ३२ हजार तोडणी स्लीपा छोट्या शेतकऱ्यांना बेसमोडवर जारी करण्यात आल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here