इथेनॉल मिश्रण : २०३० पर्यंत ११,२४७ मिलियन लिटर इथेनॉलची गरज

नवी दिल्ली : भारत सरकारने पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिश्रण करण्याचे आपले उद्दिष्ट २०३० पासून २०२५ वर आणले आहे. मिझोराम-आयजोलच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीतील संशोधकांच्या एका गटाने देशाला २०३० पर्यंत पेट्रोल आणि इथेनॉल यांची किती गरज भासेल याचे अनुमान निश्चित करण्यासाठी सांख्यिकीय पद्धतींचा वापर केला आहे. त्यांच्या अध्ययनात विविध रेखिक आणि गैर रेखिक प्रतिगमन मॉडेलचा वापर करण्यात आला. यासोबतच ऑटोरेग्रेसिव्ह इंटिग्रेटेड मुव्हिंग अॅव्हरेज (ARIMA) मॉडेल विकसित करण्यात आले आहे. आणि भारतात पेट्रोलच्या मागणीच्या पूर्वानुमानासाठी त्याची तुलना करण्यात आली.

या निष्कर्षांसाठी १९९७ ते २०२१ पर्यंतच्या पेट्रोलच्या खपाचा डेटा वापरण्यात आला आहे. या अभ्यासानुसार देशात २०३० मध्ये पेट्रोलची मागणी ५६,२३६.६३२ मिलियन लिटर असेल. आणि २० टक्के मिश्रणाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी ११,२४७.३२६ मिलियन लिटर इथेनॉलची गरज भासेल. सध्याचे देशांतर्गत इथेनॉल उत्पादन उद्दिष्ट यापेक्षा खूप मागे आहे.

या संशोधनात म्हटले आहे की, जर देशांतर्गत इथेनॉल उत्पादन वाढविण्याचे प्रभावी प्रयत्न केले गेले नाही, तर इथेनॉलची तूट मोठ्या प्रमाणात राहील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here