टोळ दलाच्या आक्रमणाचा संशय, मका, ऊस  पीकांना धोंका, यूपी च्या अनेक जिल्ह्यात सतर्कतेचा इशारा


कानपुर
 :टोळ दलाच्या मुद्द्यावरुन जिल्हा कृषी रक्षा अधिकारी यांनी घाटमपूर आणि सरसौल ब्लॉक च्या शेतकर्‍यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. सांगितले आहे की, ब्लॉक स्तरावर तैनात कर्मचार्‍यांना यापूर्वीच सतर्क केले आहे. जिल्ह्यामध्ये 1200 लीटर केमिकलही तयार ठेवले आहे. कर्मचारी शेतकर्‍यांना टोळ दलांना पळवुन लावण्याच्या पद्धती सांगत आहेत.
जिल्हा कृषी रक्षा अधिकारी आशीष कुमार यांनी सांगितले की, घाटमपुर, सरसौल, चौबेपूर, बिल्हौर, ककवन, पतारा आदी ब्लॉक मध्ये मका, ऊस , मूग अशी पीके अधिक आहेत. अशा परिस्थितीत टोळांपासून या पीकांना धोका आहे.

शेतकर्‍यांना सांगण्यात आले आहे की, टोळ दिसू लागले की थाळी, प्लेट जोराने वाजवून मोठा गोंधळ करावा. ब्लॉक स्तरवराही ग्रामीण लोकांनी आसपासच्या परिसरात लक्ष ठेवण्यासाठी टोळी तयार केली आहे.

आशीष यांनी सांगितले की, टोळ दलाच्या हल्ल्यातून  बचावासाठी वाराणसी, फतेहपूर, उन्नाव, हमीरपूर मध्येही सतर्कतेचा इशारा दिला आहे. मंगळवारी टोळ दलाने प्रयागराज मध्ये प्रवेश केला होता. प्रशासन आणि कृषी विभागाने तयाचवेळी केमिकल फवारणी केली. शेतकर्‍यांनी गोंधळ केला आणि थाळी वाजवली त्यामुळे टोळांची झुंड फैजाबाद कडे गेली. अशामध्ये कानपूर मध्ये धोका कमी झाला आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here