कर्नाटकचे माजी मंत्री श्रीमंत पाटील यांना डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशनतर्फे ‘साखर उद्योग पुरस्कार’ जाहीर

बेळगाव : पुणे येथील डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन यांच्यातर्फे अथणी शुगर्स उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष व माजी मंत्री श्रीमंत (तात्या) पाटील यांना प्रतिष्ठेचा ‘साखर उद्योग पुरस्कार’ जाहीर झाला आहे. संस्थेच्या ७१ व्या वार्षिक अधिवेशनात त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. साखर उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्याच्या उद्देशाने डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशनतर्फे प्रतिवर्षी विविध पुरस्कार प्रदान करण्यात येतात.

श्रीमंत पाटील यांनी आपल्या दूरदृष्टी, प्रभावी नेतृत्व आणि कुशल मार्गदर्शनाच्या बळावर साखर उद्योगाच्या विकासासाठी मोलाचे योगदान दिले आहे. उद्योगाचे आधुनिकीकरण, कार्यक्षम श्रीमंत पाटील व्यवस्थापन आणि विविध विकासात्मक उपक्रमांच्या माध्यमातून त्यांनी साखर उद्योग क्षेत्रात स्वतंत्र व उल्लेखनीय ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत यंदाच्या साखर उद्योग पुरस्कारासाठी निवड झाली आहे. पुणे येथे दि. ८ व ९ ऑगस्ट रोजी ‘डेक्कन’चे ७१ वे वार्षिक अधिवेशन आयोजित करण्यात आले असून या अधिवेशनात श्रीमंत पाटील यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here