Gulshan Polyols ला मिळाली इथेनॉल पुरवठ्याची ऑर्डर

मुंबई : इंधन वितरण कंपन्यांकडून २२,२०९.२ किलो लिटर इथेनॉलच्या पुरवठ्यासाठी गुलशन पॉलीओल्स (Gulshan Polyols) कंपनीला १३७ कोटी रुपयांची ऑर्डर मिळाल्यानंतर कंपनीच्या शेअरमध्ये वाढ दिसून आली आहे. कंपनीला नायरा एनर्जीला ९,३०० किलो लिटर इथेनॉल पुरवठ्यासाठी ५४.४० कोटी रुपयांची ऑर्डरही मिळाली आहे.

कंपनीच्या महाराष्ट्रातील बोरेगाव येथील ५०० KLPD इथेनॉल प्लांटमधून आगामी एप्रिल २०२३ पासून इथेनॉलचा तात्पुरता पुरवठा सुरू केला जाणार आहे. इंधन वितरण कंपन्यांनी देशभरात विविध ठिकाणी ३१ ऑक्टोबर २०२३ पर्यंत इथेनॉल पुरवठा करण्यासाठी मोलॅसिस आणि धान्यावर आधारित डिस्टिलरींना आमंत्रित केले होते. गुलशन पॉलीओल्सने तेल विपणन कंपन्यांच्या (OMCs) या निविदांमध्ये सहभाग घेतला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here