देशात पुढील दोन वर्षात इथेनॉलवर धावणार अवजड वाहने, ५ हजार पंप सुरू होणार

नवी दिल्ली : अमेरिका आणि इराण संघर्षामुळे कच्च्या तेलाचे भाव शंभर डॉलरवर गेले आहेत. कच्च्या तेलाचे अवलंबित्व ९० टक्के असल्याने भारताचे आर्थिक वर्ष २०२६ मध्ये १०.९ लाख कोटी रुपये कच्च्या तेलावर खर्च झाले आहेत. त्यामुळे पर्यायी इंधन वापरावर भर देण्यात येणार आहे. त्यासाठी संपूर्ण इथेनॉलवर चालणारी वाहने आणि इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकार आक्रमक धोरण राबविणार आहे. पुढील दोन वर्षांत देशात E100 (संपूर्ण इथेनॉल) इंधनाचे ५,००० पंप सुरू करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सरकारने हाती घेतला आहे. यात कार व अवजड वाहनांना प्राधान्य दिले जाणार आहे. वाहन उत्पादकांनी शंभर टक्के इथेनॉलवर चालणाऱ्या वाहनांचे प्रोटोटाइप आधीच विकसित केले आहेत, परंतु इंधन केंद्रांची कमतरता आणि किमतींमुळे ही वाहने सादर केलेली नाहीत. ई-१०० इंधन उपलब्ध झाल्यास कंपन्या देखील वाहने बाजारात आणतील.

दरम्यान, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने पुढील दोन वर्षांत ई-१०० इंधनाच्या वितरणासाठी ५ हजार केंद्र स्थापन करण्याची योजना आखली आहे. दिल्ली, मुंबई, पुणे आणि नागपूर यांसारख्या प्रमुख शहरी केंद्रांमध्ये १५० रिटेल आऊटलेट्स कार्यान्वित होतील. तसेच, बंगळुरू, चेन्नई, कोलकाता आणि हैदराबादमध्येही इथेनॉल वितरण केंद्र उभारली जातील. तर सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्सने (सियाम) ई-१०० ची किंमत सामान्य पेट्रोलपेक्षा किमान ३० टक्के कमी ठेवण्याचा प्रस्ताव दिला आहे. कमी मायलेजची भरपाई करण्यासाठी आणि किंमतीबाबत संवेदनशील बाजारपेठेत मागणीला चालना देण्यासाठी किमतीतील हा फरक आवश्यक असल्याचे सियामने म्हटले आहे. इथेनॉलच्या कार्यक्षमतेतील कमतरता दूर करण्यासाठी हा फरक आवश्यक असल्याचे ‘सियाम’चे म्हणणे आहे.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here