क्रूड ऑईलच्या दरात वाढ, पेट्रोल-डिझेलचे दर जैसे थे

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत गेल्या २४ तासात कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाली आहे. मात्र, आज २० डिसेंबर रोजी देशातील मुख्य सरकारी इंधन कंपन्या, भारत पेट्रोलियम, हिंदुस्तान पेट्रोलियम आणि इंडियन ऑइलने पेट्रोल-डिझेलचे दर जाहीर केले आहेत. पेट्रोलियम कंपन्यांनी आपल्या दरात कोणत्याही प्रकारची वाढ केलेली नाही. देशातील सर्व महानगरांमध्ये आणि इतर भागात पेट्रोल, डिझेलचे दर जैसे थे आहेत.

एबीपी लाईव्हमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, दिल्लीत पेट्रोलचा दर ९६.७२ रुपये प्रती लिटर आहे. तर डिझेल ८९.६२ रुपये प्रती लिटर दराने विक्री केले जात आहे. मुंबईत पेट्रोल १०६.३१ रुपये आणि डिझेल ९४.२७ रुपये प्रती लिटरने मिळत आहे. कोलकातामध्ये पेट्रोल १०६.०३ रुपये आणि डिझेल ९२.७६ रुपये प्रती लिटरने विक्री केले जात आहे. चेन्नईत पेट्रोल १०२.६३ रुपये आणि डिझेल ९४.२४ रुपये प्रती लिटरने मिळत आहे. सर्व महानगरांमध्ये इंधनाचे दर जैसे थे आहेत.

मंगळवारी कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे. डब्ल्यूटीआय क्रूड ऑईल ०.४८ टक्के वाढले आहे. हा दर प्रती बॅरल ७५.६७ डॉलरवर पोहोचला आहे. तर ब्रेंट क्रूड ऑईलचा दर ०.७६ टक्के वाढून ७९.८० डॉलर प्रती बॅरलवर आला आहे. पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे दर दररोज बदलतात. सकाळी सहा वाजता ते अपडेट केले जातात. पेट्रोल डिझेलचे नवे दर तुम्ही SMS च्या माध्यमातून जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलचे ग्राहक RSP यासोबत आपल्या शहराचा कोड नंबर लिहून ९२२४९९२२४९ या क्रमांकावर एसएमएस करू शकतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here