महाराष्ट्राप्रमाणे या हंगामात कर्नाटकमध्येही साखर उत्पादनात वाढ दिसून आली आहे. कर्नाटकमध्ये चालू हंगामात आतापर्यंत सर्वाधिक साखर उत्पादन झाल्याचे म्हटले जात आहे. इंडियन शुगर मिल्स असोसिएशनच्या (ईस्मा) म्हणण्यानुसार कर्नाटकमध्ये ३१ मार्च २०२२ पर्यंत ७२ साखर कारखान्यांनी ५७.६५ लाख टन साखरेचे उत्पादन घेतले आहे. महाराष्ट्रातप्रमाणेच कर्नाटकमध्येही आता आतापर्यंत हे सर्वोच्च साखर उत्पादन आहे. राज्यातील ७२ साखर कारखान्यांपैकी ५१ कारखान्यांनी आपले गाळप बंद केले आहे. अद्याप २१ कारखाने सुरूच आहेत. गेल्या वर्षी याच कालावधीत ६७ साखर कारखान्यांनी ४२.३८ लाख टन साखर उत्पादन केले होते. गेल्या वर्षी ३१ मार्च २०२१ पर्यंत ६७ साखर कारखान्यांपैकी ६६ कारखान्यांच्या गाळप हंगामाची समाप्ती करण्यात आली होती. केवळ एक कारखाना या वेळेपर्यंत सुरू होता.
Recent Posts
साखरेच्या MSP प्रश्नी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली अमित शहांची भेट
नवी दिल्ली : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी साखरेच्या किमान विक्री दर (MSP) प्रश्नी केंद्रीय गृहमंत्री तथा सहकार मंत्री अमित शहा यांची भेट घेऊन...
Pakistan: Prime Minister raises concern over inaccurate sugar data
Islamabad: Prime Minister Shehbaz Sharif has raised serious concerns over the inaccurate sugar stock data provided by the relevant ministries. During a recent cabinet...
सातारा : ऊसदराची कोंडी फुटली, कृष्णा, जयवंत शुगर्सकडून प्रती टन ३२०० रुपये पहिली उचल...
सातारा: जिल्ह्यातील ऊसदराची कोंडी फुटली आहे. रेठरे बुद्रुक येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याने आणि धावरवाडी येथील जयवंत शुगर्सने २०२४-२५ या गाळप हंगामासाठी प्रती...
Fitch revises down India’s 2024-25 GDP forecast to 6.4 per cent
Fitch Ratings has revised India's GDP forecast for 2024-25 to 6.4 per cent from its previous estimate of 7.0 per cent.
The downward revision from...
उत्तर प्रदेशातील १२० पैकी १०० साखर कारखाने दर आठवड्याला ऊस बिले देतायत : मुख्यमंत्री...
लखनौ : उत्तर प्रदेशातील साखर कारखानदार आता शेतकऱ्यांना वेळेवर ऊसाचे बील देत आहेत. राज्यातील १२० पैकी १०० साखर कारखान्यांनी एका आठवड्यात बिले दिली आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी...
सिंधुदुर्ग : अती पावसाचा उसाला फटका, उत्पादन घटण्याची शक्यता
सिंधुदुर्ग : यंदा लांबलेल्या पावसामुळे असळज (ता. गगनबावडा, जि. कोल्हापूर) येथील डॉ. डी. वाय. पाटील साखर कारखान्याचा ऊस गाळप हंगाम दरवर्षीच्या तुलनेत २५ दिवसांनी विलंबाने...
गोवा : आर्थिक मदत सुरू ठेवण्याची ऊस उत्पादक शेतकऱ्यांची राज्य सरकारला विनंती
फोंडा : दक्षिण गोव्यातील धारबांदोडा येथील संजीवनी साखर कारखाना बंद पडल्यानंतर राज्य सरकारकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या आर्थिक मदतीचा पाच वर्षांचा कालावधी या महिन्यात...