ऊस बिलांसाठी भारतीय किसान युनीयनचे आंदोलन

72

अमरोहा : भारतीय किसान युनीयन लोकशक्तीच्या पदाधिकाऱ्यांनी विविध सहा मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. आपल्या विविध मागण्यांचे पंतप्रधानांच्या नावे असलेले निवेदन उप जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.

जिल्हाध्यक्ष हाजी हसीन अहमद गफ्फारी यांच्या नेतृत्वाखाली संघटनेचे पदाधिकारी आपल्या सहा मागण्या घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयामोर आले. त्यांनी तेथे निदर्शने केली. केंद्र सरकारने लागू केलेली तीन कृषी विधेयके मागे घ्यावीत, शेतकऱ्यांना उसाचे पैसे तातडीने द्यावेत, वीजेच्या दरातील घोटाळा दूर करावा, एमएसपी हमीचा कायदा लागू करावा आदी मागण्यांचा यामध्ये समावेश होता. या मागण्यांचे निवेदन उप जिल्हाधिऱ्यांना देण्यात आले. यावेळी हारुण, नफीस, रामगोपाल, सुमित कुमार, हुकूम सिंह, विरेंद्र सिंह आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here