लोकमंगल शुगर्सची शेतकऱ्यांना दिलासा देणारी घोषणा! प्रतिटन ३ हजार रुपये ऊसबिल शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा

सोलापूर : लोकमंगल शुगर्सच्या तीनही साखर कारखान्यांना ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. गळीत हंगाम २०२६-२७ अंतर्गत ३१ ऑक्टोबर २०२६ पर्यंत पुरवठा केलेल्या उसाचे बिल प्रतिमेट्रिक टन ३ हजार रुपये दराने शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर जमा करण्यात आले आहे. यंदाच्या हंगामासाठी जाहीर केलेल्या दरानुसार ही रक्कम अदा करण्यात आल्याची माहिती लोकमंगल उद्योग समूहाच्या वतीने देण्यात आली.

लोकमंगलच्या तीनही कारखान्यांकडून ऊसबिल अदा

ChiniMandi WhatsApp Channel

लोकमंगल उद्योग समूहाच्या तीन साखर कारखान्यांचा यामध्ये समावेश आहे. लोकमंगल अॅग्रो इंडस्ट्रीज लिमिटेड – सुभाषनगर (बीबीदारफळ), लोकमंगल शुगर इथेनॉल अँड को-जनरेशन इंडस्ट्रीज लिमिटेड – भंडारकवठे, लोकमंगल माऊली इंडस्ट्रीज लिमिटेड – लोहारा (धाराशिव). या तिन्ही कारखान्यांना ऊस पुरवठा केलेल्या शेतकऱ्यांना प्रतिमेट्रिक टन ३ हजार रुपये दराने ऊसबिलाची रक्कम देण्यात आली आहे.

दर दहा दिवसांनी मिळणार ऊसबिल

गळीत हंगाम २०२६-२७ मध्ये कारखान्यांना गाळपासाठी येणाऱ्या उसाचे बिल दर दहा दिवसांनी अदा करण्यात येणार असल्याचे समूहाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच शेतकऱ्यांनी लोकमंगल समूहाच्या तिन्ही कारखान्यांना जास्तीत जास्त ऊस पुरवठा करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. सर्व शेतकरी, कर्मचारी आणि संबंधित घटकांच्या सहकार्याने यंदाच्या हंगामात विक्रमी ऊस गाळपाचे उद्दिष्ट साध्य करण्याचा समूहाचा प्रयत्न आहे.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here