ऊसतोड मजुरांची तपासणी करून त्यांना घरी पाठवा: मंत्री धनंजय मुंडे यांची मागणी

137

परळी वैजनाथ (जि.बीड): ऊसतोड मजुरांना त्यांची आरोग्य तपासणी करुन पशुधनासह कोरोना संक्रमण रोखण्याबाबतची खबरदारी घेवून आपल्या मूळ गावी परतण्यासाठी राज्य सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एका पत्राच्या माध्यमातून केली.

राज्यातील साखर कारखाने, विविध जिल्ह्यातील निवारागृहे याठिकाणी हे ऊसतोड मजुर अडकलेले आहेत. लॉकडाउनमुळे बीड, अहमदनगरसह इतर जिल्ह्यातील दीड लाखाहून अधिक ऊसतोड मजुर पश्‍चिम महाराष्ट्र, कर्नाटक सीमाभाग याठिकाणी हे मजुर अडकलेले आहेत. कारखाने बंद झाल्यामुळे या मजुरांना आपल्या गावी परतही जाता येत नाही. अशा मजुरांची शासनाने निवास आणि भोजनाची तात्पुरती सोय केली आहे. तसेच या मजुरांना अधिक मदत पोचवण्यासाठी स्थानिक प्रशासन प्रयत्नशील आहे.

शिवाय 30 एप्रिलपर्यंत लॉकडाउन वाढवण्यात आल्यामुळे ऊसतोड मजुरांच्या उपजीविकेच्या प्रश्‍नासह त्यांच्या पशुधनाचा व चार्‍याचा प्रश्‍न गंभीर आहे. यामुळे या कामगारांची त्यांच्या गावाकडे असलेल्या कुटुंबातील वृद्ध व लहान मुले यांची फरफट होत आहे. त्यामुळे या सर्व मजुरांना त्यांच्या पशुधनासह आपापल्या मूळ गावी आणणे आता अनिवार्य बनले आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here