जळगाव : वसंत सहकारी साखर कारखान्याच्या थकीत ऊस बिलप्रश्नी शेतकऱ्यांचे बेमुदत उपोषण

जळगाव : वसंत सहकारी साखर कारखाना सध्या भैरवनाथ शुगर फॅक्टरीने भाडे तत्त्वावर चालवायला घेतला आहे. मात्र, १ जानेवारीपासून आजतागायत गाळप झालेल्या उसाचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेले नाहीत. नियमानुसार ऊस कारखान्याला घातल्यानंतर १४ दिवसांच्या आत पेमेंट मिळणे बंधनकारक असताना, अनेक महिने उलटूनही मोबदला न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. याप्रश्नी शेतकरी नेते चितांगराव कदम हे शनिवारपासून शेतकऱ्यांसह कारखान्याच्या प्रवेशद्वारासमोर बेमुदत उपोषणाला बसले आहेत. या उपोषणाला परिसरातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पाठिंबा दर्शविला आहे.

वसंत सहकारी साखर कारखान्याकडून शेतकऱ्यांना जानेवारी महिन्यापासूनचे पैसे मिळालेले नाहीत. ३१ मार्चपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात केले पेमेंट जमा करावे अन्यथा आंदोलन करू असा इशारा चितांगराव कदम यांनी चार दिवसांपूर्वी कारखाना प्रशासनाला दिला होता. तरीही कारखाना प्रशासनाने उसाचे थकीत पेमेंट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले नाहीत. सध्या शेतकरी आर्थिक विवंचनेत आहे. मुलांचे शिक्षण, औषधोपचार आणि दैनंदिन उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर आहे. शासनाच्या नियमांची पायमल्ली करत कारखाना प्रशासनाने शेतकऱ्यांचे पैसे अडवून ठेवले आहेत. जोपर्यंत थकीत पेमेंट मिळत नाही, तोपर्यंत हे उपोषण मागे घेतले जाणार नाही, असा इशारा कदम यांनी दिला.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here